Mumbai Pune Expressway : महाराष्ट्रात मागील काही वर्षापासून इन्फ्रास्ट्रक्चरची कामे मोठ्या प्रमाणात गतीला लागले आहेत. अनेक ठिकाणी नवनवीन महामार्ग आणि उड्डाणपुलाची निर्मिती झाल्याने प्रवाशांचा प्रवास हा सोपा आणि आरामदाय होत आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून आगामी 2026 साठी महाराष्ट्रातील रस्ते बांधणीसाठी 1.50 लाख कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहेत. या सर्व रस्ते प्रकल्पाची कामे पुढील तीन महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिले यावेळी त्यांनी मुंबई पुणे दरम्यान, नवीन समांतर महामार्ग उभारणार असल्याची घोषणा करून टाकली.
15,000 कोटींचा प्रकल्प (Mumbai Pune Expressway)
विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, सध्याच्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला समांतर असा नवीन महामार्ग उभारला जात आहे. अटल ब्रीजवरून येत जेएनपीटीकडे गेलो की ग्रीनफिल्ड लिंक अटल सेतू-जेनएपीटी चौक ते पुणे-शिवार जंक्शन असा पुणे-बेंगळुरू एक्सप्रेस हायवेचा १३० किलोमीटरचा भाग आहे. या मार्गासाठी अंदाजे खर्च 15,000 कोटी रुपये आहे. या नवीन महामार्गामुळं दोन्ही शहरातील अंतर अवघ्या दीड तासांचे होईल. तर, मुंबई-पुणे-बेंगळुरू प्रवासाचा वेळ साडेपाच तासांवर येईल. नितीन गडकरी यांच्या या घोषणानंतर मुंबईहून पुण्याला प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. Mumbai Pune Expressway
पुणे छत्रपती संभाजीनगर महामार्गही उभारणार
दरम्यान, एमएसआयडीसी (महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ) 16,318 कोटी रुपयांचा निधी खर्च करुन पुणे संभाजीनगर नवीन द्रुतगती महामार्गाची निर्मिती करणार आहे. त्यासाठी सामंजस्य करारावर प्रक्रियादेखील करण्यात आली आहे. या नवीन महामार्गामुळं पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवासाचा वेळ दोन तासांनी कमी होणार आहे. तर, छत्रपती संभाजीनगर ते नागपूर प्रवासाचा वेळ अडीच तासांनी कमी होईल. या महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील वाहतुकीला मोठी चालना मिळेल.





