नाशिक – राज्यात सध्या राजकीय भूकंप होणार की काय? अशी शक्यता आहे. कारण राज्यातील दोन मोठे नेते अर्थात ठाकरे बंधू राज-उद्धव पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याअसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये समीर भुजबळ यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. येवला आणि नाशिकचा विकास माझ्यासमोर झालाय आणि इथल्या विकासात माझा सिंहाचा वाटा असल्याचं समीर भुजबळ आणि म्हटलं आहे.
अनेक प्रकल्पासाठी माझा हातभार…
दरम्यान, पुढे बोलताना समीर भुजबळ म्हणाले की, मी माझ्या पदाचा राजीनामा दिला होता. परंतु राजीनामा स्वीकारला नाही. आता छगन भुजबळ यांना मंत्रीपद देण्यात यावे, असे नाशिक, येवल्यात बॅनर लावलेत आहेत. असा प्रश्न भुजबळ यांना विचारला असता, हे बॅनर कोणी लावले मला माहित नाही. पण कार्यकर्त्यांची भावना असते. की आपल्या नेत्यांला मंत्रिपद मिळावे. पण ते बॅनर कोणी लावलेत मला माहित नाही, असं समीर भुजबळ म्हणाले. राज्यातील राजकीय समीकरणे बदलताहेत आणि छगन भुजबळ यांना दिल्लीत चर्चेसाठी बोलवले जातेय. काही नवीन घडताना दिसेल का, यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, या गोष्टी घडण्यास अजून उशिर आहे. मात्र येवल्यात मी काय पहिल्यांदाच येत नाही. याच्यापूर्वी अनेकवेळा आलेलो आहे आणि येवला आणि नाशिकमध्ये प्रकल्पासाठी मी हातभार लावला आहे, असं समीर भुजबळ यांनी सांगितले.

विकासात माझा सिंहाचा वाटा…
येवल्या यापूर्वी जे काही महत्त्वाचे प्रकल्प झालेत, त्याच्यात माझा सिंहाचा वाटा आहे… त्या प्रकल्पाचे प्लॅनिंग, एक्झिबिशन, ही सगळी कामं मीच केलेली आहेत. त्यामुळे मी येवल्यासाठी नवीन नाही… येवला असो, नाशिक असो, किंवा नांदगाव असो जिथे तुम्हाला डेव्हलपिंग दिसत आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा माझा होता. आणि भुजबळ साहेबांच्या आशीर्वादाने मला जे जे प्रकल्प करायला मिळाले. ते मी केले आणि यानंतरही करत राहणार असं समीर भुजबळ म्हणाले.











