Devendra Fadnavis : आज मिनाताई ठाकरे यांचा शिवाजी पार्क येथील पुतळ्यावर अज्ञान व्यक्तीने लाल रंग फेकला. रंग फेकल्याचे समजताच शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. शिवसैनिकांना आवारण्यासाठी पोलिसांचा देखील फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, मिनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्यानंतर तेथील पुतळ्याची पाहणी करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसे पक्षातील नेते शिवाजी पार्क येथे पोहचले होते. तर दुसरीकडे या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना मुख्यमंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय रंग देणं योग्य राहणार नाही
दरम्यान, पुण्यातील गणेश कला क्रिडा मंच इथं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय सेवा पंधरावळा कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मिनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं. यावेळी ते म्हणाले की, “अशा प्रकारची घटना ही निषेधार्ह आहे. ज्या कोणी समाजकंटकानं ही घटना केली आहे. त्याला पोलीस शोधून काढतील. यापेक्षा जास्त याला राजकीय रंग देणं योग्य राहणार नाही.” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

घटना अतिशय दुर्दैवी
दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ही प्रतिक्रिया समोर आली आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. आरोपीला पोलीस शोधून काढतील, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. या प्रकारानंतर शिवसैनिकांनी शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आहे. तर सध्या पोलिसांकडून जो कोणी लाल रंग फेकला आहे, त्याचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. सीसीटिव्हीच्या माध्यमातून पोलीस शोध घेताहेत.
दंगली घडविण्याचा प्रयत्न
शिवाजी पार्क येथे मिनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी घडलेल्या प्रकाराच निषेध केला. हा आज जो निंदनीय प्रकार घडला आहे. ज्याला आईवडील याचे नाव घेण्याचे लाज वाटते, त्याने असे केले असावे. अशा बेवारस, लावरीस माणसाने हे कृत्य केले असावे. नाहीतर बिहारमध्ये मोदींच्या आईंचा अपमान झाला, यानंतर बिहार बंद करण्याचा प्रयत्न असफल झाला, तसे महाराष्ट्रात दंगली घडविण्याचा प्रकार आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटले आहेत. तर पोलिसांनी आरोपीला २४ तासांचा आत आरोपीला पकडावे, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.











