मुंबई – मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघाताची घटना उघडकीस आली असून, या अपघातामध्ये भरधाव ट्रकने पाच वाहनांना जोरदार धडक दिल्याने यामध्ये बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बारा जण जखमी झाले आहेत. तर चार जण गंभीररित्या जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.
अपघात कसा झाला…
दरम्यान, मुंबई-पुणे महामार्गावर बोर घाटाच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या ट्रकने इनोवा, रिक्षा, आर्टिका, टाटा पंच अशा पाच वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर बाराजण जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी पनवेल खोपोली आणि लोणावळा येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातामध्ये चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत असून, त्यांना अतिदक्षता विभागात उपचार देण्यात येत आहेत.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला…
मुंबई-पुणेच्या दिशेने हा ट्रक अतिशय वेगाने बोरघाट उतरताना ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुढील पाच वाहनांना जाऊन धडकला. यात एका कारमधील बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला असून या बाप लेकीच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. असून, बाप-लेकिच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर घाट रस्त्यावरील तीव्र उतार आणि ट्रकच्या अतिवेगामुळे हा अपघात झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अपघातामुळे वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. यामुळे प्रवाशांना खूप मोठा त्रास सहन करावा लागला होता.











