MP Breaking News
Mon, Dec 15, 2025

महायुतीत ध्वजारोहनावरुनही धुसफूस व नाराजीनाट्य समोर, गोगावले-तटकरे यांच्यात रंगला कलगीतुरा

Written by:Astha Sutar
रायगडमध्ये आम्ही राष्ट्रवादीसाठी काम केले. एक खासदार निवडून आणला. त्यामुळं आता सुनील तटकरे यांची उलटी गिनती सुरु झाली आहे. अशी बोचरी टीका भोगावलेंनी सुनील तटकरेंवर केली.
महायुतीत ध्वजारोहनावरुनही धुसफूस व नाराजीनाट्य समोर, गोगावले-तटकरे यांच्यात रंगला कलगीतुरा

Mahayuti – महायुती सरकार येऊन 8-9 महिने झाले तरी अजूनही महायुतीतील नाराजीनाट्य काही थांबताना दिसत नाही. महायुतीतील नाशिक व रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला नसताना आता पालकमंत्री या नात्याने ध्वजारोहन कोण करणार? याकडे लक्ष लागले असताना रायगडमध्ये अदिती तटकेर तर नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन ध्वजारोहन करणारहेत. पण नाशिक येथे इच्छुक असलेले छगन भुजबळ, दादा भुसे तसेच रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांची नाराजी समोर आली आहे.

त्यामुळं महायुतीत आधीच पालकमंत्री पदावरून वाद सुरु असताना आता ध्वजारोहनावरूनही धुसफूस आणि नाराजीनाट्य चव्हाट्यावर आले आहे. यामुळं राष्ट्रवादी-शिवसेनेत चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

भुजबळांनी ध्वजारोहनास दिली नकारघंटा…

दरम्यान, सरकारने वाद टाळण्यासाठी मध्यम मार्ग म्हणून कोणत्या जिल्ह्यात कोण मंत्री ध्वजारोहण करणार याचे परिपत्रक काढलं होतं. यानुसार मंत्री छगन भुजबळ हे गोंदिया जिल्ह्याचे ध्वजारोहण करणार होते. मात्र छगन भुजबळ यांना नाशिकचे ध्वजारोहन हवे होते, ते न मिळल्यामुळं ते नाराज असल्याची चर्चा आहे, त्यामुळं त्यांनी गोंदिया जिल्ह्याचे ध्वजारोहन करण्यास नकार दिला आहे. याबाबत शासनाकडून नव्याने परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या ठिकाणी आता मंगलप्रभात लोढा हे ध्वजारोहन करणार आहेत. पण अचानक मंत्री छगन भुजबळ यांनी ध्वजारोहन करण्यास का नकार दिल्यामुळे ते महायुतीत नाराज आहेत का? या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

गोगावले-तटकरे यांच्यात तु…तु मै…मै….

तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यात शिवसेनेच नाराज असलेले मंत्री भरत गोगावले यांनी ज्या माणसानं अडीच वर्षे मंत्रीपदावरती पाणी सोडलं, तिथे पालकमंत्री काय चीज आहे? जिथे ग्रामपंचायत सदस्य लोकं सोडत नाहीत. तिथे मी अडीच वर्ष मंत्रीपद सोडलं. भरतशेठ गोगावलेचं नाव महाराष्ट्राच्या इतिहासात लिहिले जाईल, लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्रात कुठेही खासदार निवडून आला नाही. मात्र रायगडमध्ये आम्ही राष्ट्रवादीसाठी काम केले. आणि त्यांचा एक खासदार निवडून आणला. त्यामुळं आता सुनील तटकरे यांची उलटी गिनती सुरु झाली आहे. अशी बोचरी टीका भरत भोगावलेंनी खासदार सुनील तटकरेंवर केली.

मी एवढ्या लहान माणूस नाही…

पालकमंत्री काय मोठं नाही, असं म्हणत भरत गोगावलेंनी पालकमंत्री पदावरून दावा सोडण्याचे संकेत दिले आहेत. मात्र यावेळी त्यांनी सुनील तटकरेंवर जोरदार निशाणा साधला. याला तटकरे यांनीही जोरदार प्रतित्तर दिलं आहे. मी एवढ्या लहान माणूस नाही की, त्यांच्या प्रत्येक टीकेला उत्तर द्यावं. असा टोला सुनील तटकरेंनी भरत गोगावलेंना लगावला आहे. तर रायगडमधील पालकमंत्री पदाच्या वादात शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनीही उडी मारली आहे. रायगडचे पालकमंत्री पद हे शिवसेनेलाच मिळाले पाहिजे, असे थोरवे यांनी म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.