देशात २ कोटीहून अधिक आधार क्रमांक निष्क्रिय करण्यात आले आहेत. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आधार डेटाबेस अचूक आणि सुरक्षित ठेवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. हे क्रमांक प्रामुख्याने मृत व्यक्तींचे आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली. मंत्रालयाने सांगितले की, मृतांची ओळख पटविण्यासाठी UIDAI अनेक सरकारी संस्थांसोबत काम करत आहे. UIDAI ने भारतातील रजिस्ट्रार जनरल, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, सार्वजनिक वितरण व्यवस्था (रेशन सिस्टम) आणि राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम यासह अनेक स्रोतांकडून मृत व्यक्तींचा डेटा गोळा केला आहे. त्यानुसार हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
2 कोटी आधार क्रमांक निष्क्रिय
देशभरातील आधार डेटाची सुरक्षितता आणि अचूकता सुनिश्चित करण्यासाठी, UIDAI ने मृत व्यक्तींचे 2 कोटींहून अधिक आधार क्रमांक निष्क्रिय केले आहेत. गैरवापर आणि फसवणूक रोखण्यासाठी UIDAI ने विविध सरकारी विभाग आणि भारताच्या रजिस्ट्रार जनरलकडून ही माहिती गोळा केली आहे. कुटुंबातील सदस्य आता myAadhaar पोर्टलवर मृत नातेवाईकांची माहिती ऑनलाईन देऊन आधार निष्क्रिय करू शकतात.
UIDAI ने देशभरातील त्यांच्या डेटाबेसमधून 2 कोटी मृत व्यक्तींची नावे काढून टाकली आहेत. फसवणूक किंवा गैरवापर रोखण्यासाठी UIDAI ने मृत व्यक्तींचे आधार क्रमांक निष्क्रिय केले आहेत. UIDAI ने हा डेटा भारताचे रजिस्ट्रार जनरल, राज्ये / केंद्रशासित प्रदेश, सार्वजनिक वितरण व्यवस्था, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम आणि अनेक सरकारी विभागांकडून मिळवला आहे. मृत व्यक्तींबद्दल अधिक अचूक माहिती सुनिश्चित करण्यासाठी UIDAI बँका आणि इतर संस्थांशी सहकार्य करण्याचे काम करत आहे.
आधार प्रणाली अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न
या वर्षी जूनमध्ये, UIDAI ने myAadhaar पोर्टलवर एक नवीन सुविधा सुरू केली. यामुळे कोणालाही कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूची ऑनलाइन तक्रार करता येते. सध्या, ही सुविधा २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू करण्यात आली आहे ज्याचा थेट संबंध नागरी नोंदणी प्रणालीशी आहे. उर्वरित राज्यांमध्येही लवकरच विस्तार केला जात आहे.
आधार अपडेट आणि नवीन नोंदणी सुलभ करण्यासाठी UIDAI ने एक नवीन कागदपत्रांची यादी जारी केली आहे. पूर्वी लोकांना आधार तयार करताना किंवा अपडेट करताना अनेक अडचणी येत होत्या, परंतु आता नवीन नियमांमुळे ते खूप सोपे होईल. नवीन यादीमध्ये, UIDAI ने स्पष्ट केले आहे की PoI (ओळखपत्राचा पुरावा), PoA (पत्त्याचा पुरावा), DoB (जन्मपत्राचा पुरावा) आणि PoR (नातेसंबंधाचा पुरावा) साठी कोणते कागदपत्रे वैध आहेत.












