नवी मुंबईकरांसाठी खरंतर एक महत्वाची अशी बातमी समोर येत आहे. नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत तब्बल 30 तासांसाठी पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे आणि काटकसरीने वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. नवी मुंबईतील महानगरपालिकेने एक सूचना जारी करून पाणीकपातीची घोषणा केली आहे. सापोली गावाजवळील हेतवणे पाईपलाईनमध्ये तातडीची दुरुस्ती करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यामुळे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा 30 तासांसाठी बंद राहणार आहे.
कोणत्या एरीयात आणि कधी पाणीपुरवठा बंद?
समोर येणाऱ्या माहितीनुसार, महापालिकेने दिलेल्या सूचनेनुसार गरुवारी 27 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजेपासून दुरुस्तीची कामे सुरू होतील आणि शुक्रवारी 28 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनचा परिणाम प्रामुख्याने खारघर, तळोजा, उलवे आणि द्रोणागिरी या नोड्सवर होणार आहे.

महापालिकेने स्पष्ट केले आहे की शुक्रवारी 28 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 नंतर पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात येईल. मात्र सुरुवातीच्या काही तासांत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल आणि पुरवठा मर्यादित स्वरूपात असेल. त्यामुळे नागरिकांनी या काळात आवश्यक तेवढा पाण्याचा साठा करून ठेवावा तसेच पाण्याचा वापर संयमाने करण्याचे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन
नवी मुंबई महापालिकेच्या जलपुरवठा विभागाकडून देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी काही भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नियोजित कामांच्या कालावधीत टँकरद्वारे मर्यादित पाणीपुरवठा केला जाईल. महापालिकेने नागरिकांना अनावश्यक पाणी वापर टाळण्याचे, पाणी साठवून ठेवण्याचे आणि स्वच्छतेसाठी पाणी वाया घालवू नये असे आवाहन केले आहे. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
🚰 पाणीपुरवठा बंदची महत्त्वाची सूचना 🚰
नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे कळविण्यात येत आहे की, सापोली गावाजवळील हेतवणे पाईपलाईनवर तातडीच्या दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवार, 27.11.2025 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शुक्रवार, 28.11.2025 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत — एकूण 30 तास — खारघर, तळोजा,… pic.twitter.com/ryazLmaZFV— CIDCO Ltd (@CIDCO_Ltd) November 26, 2025











