बेवारस, लावारीस व्यक्तीने कृत्य केले असावे, मिनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्यावरुन उद्धव ठाकरे काय म्हणाले?

बिहारमध्ये मोदींच्या आईंचा अपमान झाला, त्यानंतर बिहार बंद करण्याचा असफल प्रयत्न झाला. तसाचा कोणाचा तरी महाराष्ट्र पेटविण्याचा प्रयत्न असावा, आणि हे जे कोणी केले आहे, त्याला पोलिसांना पकडावे, अशी उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Uddhav Thackeray : आज हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मिनाताई ठाकरे यांचा शिवाजी पार्क येथील पुतळ्यावर अज्ञान व्यक्तीने लाल रंग फेकला. रंग फेकल्याचे समजताच दुपारी शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शिवसैनिकांना आवारण्यासाठी पोलिसांचा देखील फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, मिनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्यानंतर तेथील पुतळ्याची पाहणी करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसे पक्षातील नेते शिवाजी पार्क येथे पोहचले होते.

यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पुतळ्याची पाहणी केली. यानंतर आरोपीला २४ तासांचा आत पकडा, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. तर हा अत्यंत निंदनीय प्रकार असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी केली आहे.

निंदनीय प्रकार…

दरम्यान, मिनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्यानंतर शिवाजी पार्क येथील वातावरण तापले आहे. या ठिकाणी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, किशोरी पेडणेकर, मनसे नेते बाळा नांदगावकर, खासदार अनिल देसाई आदी शिवाजी पार्क येथे मिनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ दाखल झाले. दरम्यान, पुतळ्याची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी घडलेल्या प्रकाराच निषेध केला. हा आज जो निंदनीय प्रकार घडला आहे. ज्याला आईवडील याचे नाव घेण्याचे लाज वाटते, त्याने असे केले असावे. अशा बेवारस, लावरीस माणसाने हे कृत्य केले असावे. नाहीतर बिहारमध्ये मोदींच्या आईंचा अपमान झाला,

त्यानंतर बिहार बंद करण्याचा असफल प्रयत्न झाला. तसाचा कोणाचा तरी महाराष्ट्र पेटविण्याचा प्रयत्न असावा, आणि हे जे कोणी केले आहे, त्याला पोलिसांना पकडावे, अशी उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

आरोपीला २४ तासांचा आत पकडावे

दुसरीकडे या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येताहेत. या प्रकारानंतर शिवसैनिकांनी शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आहे. तर सध्या पोलिसांकडून जो कोणी लाल रंग फेकला आहे, त्याचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. सीसीटिव्हीच्या माध्यमातून पोलीस शोध घेताहेत. तर पोलिसांनी आरोपीला २४ तासांचा आत पकडावे, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. तसेच घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News