महिलांकडून पुरषांच्या होणाऱ्या आर्थिक फसवणुकीच्या अनेक घटना अलीकडच्या काळात समोर येत आहेत. नागपूर येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका शिक्षिकेचा म्हणजेच लुटेरी दुल्हनचा कहर समोर आला आहे. एका महिलेने प्रेम आणि विवाहाच्या नावाखाली आठ पुरुषांची दिशाभूल करत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं काय घडलंय, नागपुरात सविस्तर जाणून घेऊ…
शिक्षिका कशी बनली लुटेरी दुल्हन?
नागपुरातील नेमकं प्रकरण काय ?
नागपूर शहरातील या घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे. प्रेम, विश्वास आणि विवाहाच्या नावाखाली फसवणुकीचा जाळं टाकणाऱ्या लुटेरी दुल्लनच्या पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या आहेत. समिरा फातिमा असे या महिलेचं नाव आहे. समीरा ही सोशल मीडियाचा वापर करून तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवत होती. त्यांच्याशी लग्न करून त्यांना मानसिक त्रास देऊन मोठी रक्कम उकळत होती. धक्कादायक म्हणजे समिरा फातिमा ही वर्षभरापासून फरार होती. अखेर तिला नागपूरच्या सिव्हिल लाईन्स भागात एका चहाच्या टपरीवर पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समिरा फातिमा सोशल मीडियावर सक्रिय होती. तिने अनेक विवाहित पुरुषांशी संपर्क साधला होता. ती स्वतः ला घटस्फोटित असल्याचे सांगत होती. दुसऱ्या पत्नी म्हणून कोणत्याही प्रकारच्या अडचणी न येऊ देता त्यांच्यासोबत संसार करण्यास तयार असल्याचा बनाव करत होता. यामुळे बरेच पुरुष तिच्या मोहजालात अडकले आणि तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला. मात्र, लग्नानंतर समिरा आपला खरा चेहरा दाखवत होती. ती त्या पुरुषांना कोर्टात तक्रार करण्याची, पोलिस केसेस दाखल करण्याची आणि सामाजिक बदनामी करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करत होती. आतापर्यंत समिराने अनेकांना लाखो रुपयांत घातलं असल्याचे पोलिस तपासात उघड झालं आहे.











