Diwali 2025 Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगची वेळ बदलली; शेअर मार्केटवाल्यांसाठी महत्वाची अपडेट

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या मुहूर्तावर संपूर्ण देश शेअर बाजारातील शुभ व्यवहाराची वाट पाहत आहे. असे मानले जाते की ‘मुहूर्त ट्रेडिंग वर व्यापार केल्याने (Diwali 2025 Muhurat Trading) गुंतवणूकदारांना समृद्धी मिळते.

भारतातील सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीकडे बघितलं जाते. दरवर्षी हा सण तेवढ्याच उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. दिवाळीचा सण म्हणजे दुष्ट प्रवृत्तीच्या केलेल्या पराभवाचं चिन्ह आहे, जो कि आपण दिव्यांच्या प्रकाशात घर आणि आजूबाजूचा परिसर उजळवून साजरा करतो. कोणत्याही इतर धार्मिक सणांप्रमाणेच दिवाळी सणाबद्दल श्रद्धा, प्रथा आणि परंपरा विपुल आहेत. यातीलच एक परंपरा म्हणजे मुहूर्त ट्रेडिंग. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या मुहूर्तावर संपूर्ण देश शेअर बाजारातील शुभ व्यवहाराची वाट पाहत आहे. असे मानले जाते की ‘मुहूर्त ट्रेडिंग वर व्यापार केल्याने (Diwali 2025 Muhurat Trading) गुंतवणूकदारांना समृद्धी मिळते.

कधी आहे यंदाचे मुहूर्त ट्रेडिंग – Diwali 2025 Muhurat Trading

मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे . या वर्षी मंगळवार, २१ ऑक्टोबर २०२५ रोजी एक विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र आयोजित केले जाईल. हे सत्र फक्त एक तास चालेल परंतु ते शुभ मानले जाते. एक्सचेंजेसच्या परिपत्रकानुसार, मुहूर्त ट्रेडिंग सोमवार, २० ऑक्टोबर ऐवजी मंगळवार, २१ ऑक्टोबर रोजी होईल. या दिवशी, भारतीय शेअर बाजार एक तासाच्या ट्रेडिंग सत्राशिवाय बंद राहील. या वर्षीच्या मुहूर्त ट्रेडिंगचे सत्र मागील पद्धतीपेक्षा वेगळे असेल आणि दुपारी १:४५ ते २:४५ पर्यंत चालेल. तर  विशेष सत्र संध्याकाळी आयोजित केले जाते.Diwali 2025 Muhurat Trading

मुहूर्त ट्रेडिंगचा इतिहास:

जुन्या काळात स्टॉक ब्रोकर्स दिवाळीच्या पवित्र दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात करत असत. त्यांच्या नवीन ग्राहकांसोबत होणारा व्यवहार इथूनच सुरु व्हायचा. या दरम्यान व्यवहाराच्या संबंधित पुस्तकाचे पूजन केले जायचे ज्याला चोपडा पूजन असे म्हणतात. कुणा एकेकाळी म्हारवाडी व्यापार्यांकडून या काळात व्यवसायाचे स्टोक्स विकले जायचे कारण त्यांची अशी मान्यता होती कि दिवाळीच्या काळात घारण पैसे येऊ नयेत, आणि दुसऱ्या बाजूला गुजराती व्यापारी मुद्दामून याच काळात नवीन व्यवहाराला सुरुवात करत असत. मात्र यात किती तथ्य आहे हे सांगता येत नाही. आजकाल व्यापारी अश्या रुढींचे एवढ्या खोलात जाऊन पालन करतात असं वाटत नाही. मात्र काही हिंदू घरांमध्ये आजही लक्ष्मी पूजन करतात तसेच नवीन गोष्टींमध्ये गुंतवणूक केली जाते


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News