नवी दिल्ली – कुठं मुसळधार पाऊस तर कुठं भीषण दुष्काळ अशी परिस्थिती सातत्यानं पाहायला मिळत आहे. आता हे फक्त आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या देशात घडतंय असं नाही. सगळीकडंच असं घडतंय. याच कारण आहे ग्लोबल वॉर्मिग. आता हे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय तर जागतिक तापमानात झालेली वाढ…
उत्तर भारताला मुसळधार पावसानं चांगलाच तडाखा दिलाय. केवळ उत्तर भारतातच नाही तर अमेरिका, मेक्सिको आणि फिलिपिन्समध्ये महापुराची स्थिती निर्माण झालीय. एकीकडे महापुराची स्थिती असताना युरोपमध्ये इटलीत उष्णतेनं होरपळण्याची वेळ अनेकांवर आलीय. महापुरामुळं आणि उष्णतेच्या लाटेत माणसांचे जीव जातायेत. एकाचवेळी ही विषम स्थिती निर्माण का झाली, यासाठी जागतिक तापमानात होणारे बदल हे कारण सांगितलं जातंय.
काय होतोय जगावर परिणाम?
बदलत्या जागतिक तापमानात जगाचं तापमान 1.5 डिग्री सेल्सिअसपेक्षा वाढण्याची शक्यता आहे.
1. जागतिक तापमानात झालेल्या वाढीनं समुद्र पातळी वाढत आहे.
2. पृथ्वीच्या दोनही ध्रुवावरील बर्फ वितळत आहे. त्यामुळं समुद्राच्या पाणी पातळीत मोठी वाढ
3.दोन्ही ध्रुवावरील बर्फ वितळण्याचं कारण तापमानात झालेली वाढ आहे
४. नवीन डेटा ग्लोबल वॉर्मिंगच्या अहवालानुसार जगाचं तापमान 1.5 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त वाढीची शक्यता
५. 2024 हे वर्ष पृथ्वीच्या तापमानाबाबत आतापर्यंतचं सर्वांत उष्ण वर्ष ठरलं आहे
या वाढत्या तापमानामुळं उष्णतेच्या प्रचंड लाटा, तीव्र वादळ आणि जंगलांमध्ये लागणार्या आगी, मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस अशा घटना घडतायेत.
देशावर मोठा परिणाम होणार?
पृथ्वीवर आलेल्या या संकटाची भीती आता जगाला सतावू लागली आहे. यावर नियंत्रण मिळण्यासाी भारतानं जवळपास 200 देशांनी मिळून एक करार केलाय. सर्व सहभागी देशांनी पृथ्वी तापमान 1.5 डिग्री सेल्सियसपेक्षा कमी राहावं यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.केंद्रानं याबाबत मोहीम हाती घेऊन काम करायला सुरुवात केली आहे. मात्र, या उपाययोजना पुरेश्या आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय. भारताची अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या शेतीसह बऱ्याच क्षेत्रावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
पृथ्वीची विनाशाच्या दिशेनं वाटचाल?
मानव जातीसह पृथ्वीवरील प्राणीमात्रांचं जीवन वाचवायचं असेल तर केवळ वसुंधैव कुटूंबकम म्हणून चालणार नाही. यासाठी प्रत्यक्षात प्रयत्न करणं आणि सगळ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. सततचे महापूर आणि उष्णतेच्या लाटा यावरुन धोक्याची घंटा वाजण्यास सुरुवात झाली आहे. पुढच्या पिढ्यांना जिवंत ठेवण्यासाठी आजपासून प्रयत्न करणं गरजेचं आहे, अन्यथा पृथ्वीचा विनाश युद्धाविना अटळ आहे.





