Indian Railway Ticket Rule | भारतीय रेल्वे ही प्रवासाचे सर्वात बेस्ट साधन आहे. रेल्वेचा प्रवास हा कमी खर्चात आणि आरामदायी असल्याने सर्वसामान्य प्रवासी रेल्वेला पसंती दर्शवतात. त्यातच रेल्वेचे जाळे संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात विस्तारलं आहे. त्यामुळे कुठे लांब जायचं असेल आणि स्वस्तात मस्त प्रवास करायचा असेल तर रेल्वेच उत्तम पर्याय मानली जाते. तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वेने आपल्या तिकीट नियमात काही बदल केले आहेत.
काय आहेत नवीन नियम Indian Railway Ticket Rule
रेल्वे विभागाच्या नवीन नियमांनुसार, ५ वर्षांखालील मुले तिकिटशिवाय प्रवास करू शकतात, जर त्यांना स्वतंत्र सीट किंवा बर्थची आवश्यकता नसेल तर. कारण अशा परिस्थितीत, पालक मुलाला त्यांच्या मांडीवर घेऊन मोफत प्रवास करू शकतात. परंत्तू , जर मुलासाठी स्वतंत्र बर्थ किंवा सीट बुक केली असेल तर, प्रौढांसाठी पूर्ण भाडे अनिवार्य असेल. भारतीय रेल्वेने प्रवाशांची सोय लक्षात घेऊन मुलांसाठी तिकीट बुकिंगशी (Railway Tickets New Rule) संबंधित नियमांमध्ये हा बदल केला आहे. या नियमामुळे प्रवासी पालकांचा अनावश्यक खर्च वाचण्यास मदत होईल. Indian Railway Ticket Rule
५ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी विशेष भाडे
दुसरीकडे ५ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी विशेष भाडे लागू केलं आहे. जर या वयोगटातील मुलाला सीट किंवा बर्थची आवश्यकता नसेल आणि तिकीट बुकिंग दरम्यान ‘नो सीट/नो बर्थ (NOSB)’ पर्याय निवडला गेला तर मुलाचे तिकीट अर्ध्या भाड्याने उपलब्ध असेल. परंतु , जर मुलासाठी सीट किंवा बर्थ बुक केली असेल तर पूर्ण प्रौढ भाडे म्हणून गृहीत धरले जाईल. याशिवाय रेल्वेने हे देखील स्पष्ट केले आहे की 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना प्रौढ मानले जाईल आणि त्यांच्या तिकिटावर सामान्य दराने भाडे भरावे लागेल. त्यांना तिकीट दरात कोणतीही सूट मिळणार नाही.





