दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी तिन्ही दलांच्या प्रमुखांची बैठक घेत लष्कराला पूर्ण सूट दिली आहे.कोठे आणि कारवाई करायची याचा निर्णय सैन्याने घ्यायचा आहे. मोदींच्या या बैठकीनंतर पाकिस्तान प्रचंड घाबरला आहे. त्यातच पाकिस्तानच्या सूचना मंत्र्याने भारत आमच्यावर कधीही हल्ला करेल, अशी भीती व्यक्त केली आहे. त्यात आता अमित शाह यांनी दिल्लीतील कार्यक्रमात जाहीर इशारा दिला आहे.
अमित शाह यांनी म्हटले की, पहलगाम आंतकवादी हल्ल्याचा चुन-चुनकर बदल घेतला जाई. हा मोदींचा भारत आहे. कोणी हे समजू नये की त्यांनी आमचे 27 लोक मारले याचा अर्थ त्यांनी लढाई जिंकली. पाकिस्तान विरोधात कठोर पावले उचलली आहेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात दहशतवाद्यांना सोडले जाणार नाही.

जगातील सर्व देश भारतासोबत
अमित शाह यांनी सांगितले की, जगभरातून भारताला पाठींबा आहे. सर्व देश भारतासोबत उभे आहे. दहशतवादा विरोधात आमची लढाई सुरूच राहील. कश्मीरमध्ये हल्ला करणारे असो, वामपंथी उग्रवादी असो कोणालाही सोडले जाणार नाही. या भूमितून दहशतवाद संपवून टाकू. दहशतवाद्यांना शिक्षा करण्यात येईल.
पाकिस्तानमध्ये परतण्याची मुदत वाढवली
भारताने पाकिस्तान नागरिकांचा व्हिजा रद्द करत त्यांना पुन्हा पाकिस्तानाला जाण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी 30 एप्रिलपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, हा या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. गृहमंत्रलायकडून त्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत पाकिस्तानी नागरिक त्यांच्या देशात जाऊ शकतात असे म्हटले आहे.
पाकिस्तानची आर्थिक कोंडी
भारताने पाकिस्तानसोबतच्या होणारा व्यापार पूर्णपणे थांबवला आहे. तसेच तिसऱ्या देशाच्या माध्यमातून देखील पाकिस्तानसोबत व्यापार होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो आहे. मागील दोन दिवसांपासून पाकिस्तानचा शेअर बाजार देखील कोसळत आहे. तसेच भारताने सिंधू जल करार स्थगित केल्याने त्याचा फटका पाकिस्तानच्या 24 कोटी नागरिकांना बसणार आहे.











