मोठी बातमी! विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले, नेमकं कारण काय?

Arundhati Gadale

दिल्ली : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पीएमओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकार मोठी कारवाईच्या तयारीत असताना ही भेट झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. मात्र, सीबीआय डायरेक्टरच्या नियुक्तीसाठी बैठक असल्याने ही भेट झाली आहे. या बैठकीला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधी देखील उपस्थित होते.

कॅबिनेट नियुक्त समिती (ACC) ही सीबीआय डायरेक्टर पदासाठी नियुक्ती करती. या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्याचे काम पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश यांच्या बैठकीत केले जाते. सध्या सीबीआयचे डायरेक्टर प्रवीण सूद आहेत. ते 25 मे सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे नवीन डायरेक्टर नियुक्तीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

प्रवीण सूद सेवानिवृत्त होणार

कर्नाटकचे डीजीपी असलेले प्रवीण सूद यांची सीबीआयच्या डायरेक्टरपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी तत्कालीन डायरेक्टर सुबोध जयस्वाल यांच्याकडून डायरेक्टरपदाचा कार्यभार घेतला होता. 2023 मध्ये सूद यांची नियु्क्ती झाली होती. दोन वर्षात त्यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे नवीन डायरेक्टरची नियुक्ती करण्यात येणार आहे. सूद हे 25 मे रोजी सेवानिवृत्त होतील.

सीबीआय डायरेक्टरपदी नियुक्तीसाठी पात्रता

सीबीआयचा डायरेक्टर म्हणून नियुक्तीसाठी IPS अधिकारी म्हणून अखिल भारतीय स्तरावर 30 वर्षांच्या सेवेचा अनुभव आवश्यक आहे. तसेच गु्प्त माहिती संकलित करण्याचा देखील अनुभव हवा. शिवाय कोणत्या प्रकराचा भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी कृत्याची केस असून नये, अशा पात्र उमेदवाराची निवड सीबीआय डायरेक्टरपदी होते.

 

 

 

ताज्या बातम्या