UPSC RESULT: युपीएससीचा निकाल जाहीर, पुण्याचा अर्चित पराग डोंगरे देशात तिसरा

Rohit Shinde

पुणे: केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससीचा निकाल जाहीर झाला आहे. 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षांचा निकाल समोर आला असून शक्ती दुबेने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. ऑल इंडिया रँकमध्ये दुसऱ्या क्रमांकावर हर्षिता गोयल असून पुण्याच्या अर्चित पराग डोंगरे याने तिसरा क्रमांक मिळवला आहे.

पुण्याचा अर्चित देशात तिसरा

देशभरातील लाखो विद्यार्थी ही परीक्षा देत असतात. जगभरातल्या कठीण परीक्षांमध्ये युपीएससीची ओळख होते. या परीक्षेच्या निवड प्रक्रियेत तीन टप्पे असतात पूर्वपरीक्षा, मेन्स (मुख्य) आणि मुलाखत. तिन्ही टप्प्यांवर उमेदवाराचं मूल्यांकन करून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते. यामध्ये शक्ती दुबेने देशात पहिली रँक मिळवली आहे. तर हर्षिता गोयल दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुण्याच्या अर्चित पराग डोंगरे याने तिसरी रँक मिळवली.

देशाला मिळणारे नव्या दमाचे अधिकारी

या परिक्षेमुळे देशाला प्रशासकीय सेवा, परराष्ट्र सेवा, राजस्व सेवा यामध्ये नव्या दमाचे अधिकारी मिळणार आहेत. भारतीय प्रशासकीय सेवा , भारतीय परराष्ट्र सेवा आणि भारतीय पोलिस सेवा आणि केंद्रीय सेवा, गट ‘अ’ आणि गट ‘ब’ मध्ये नियुक्तीसाठी एकूण 1,009 उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे.अंतिम निवड झालेल्या उमेदवारांमध्ये 335 उमेदवार हे सामान्य प्रवर्गातील आहेत. 109 उमेदवार हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत गट (EWS )मधील आहेत. 318 उमेदवार ओबीसी प्रवर्गातील आहेत. 160 उमेदवार अनुसूचित जाती या प्रवर्गातले आहेत. 87 उमेदवार हे अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील आहेत.

यूपीएससी टॉपर्सची यादी 

1) शक्ती दुबे

2) हर्षिता गोयल

3) डोंगरे अर्चित पराग

4) शहा मार्गी चिराग

5) आकाश गर्ग

आगामी काळात यशस्वी उमेदवारांना प्रशिक्षण देत त्यांना देशसेवा बजावण्याचे भाग्य मिळणार आहे. देशाला नव्या दमाचे आणि् नव्या विचारांचे अधिकारी या निमित्ताने मिळणार आहेत.

ताज्या बातम्या