Jammu Kashmir Landslides : वैष्णो देवीच्या यात्रा मार्गावर मोठी दुर्घटना घडली आहे. येथे झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर १४ जण जखमी आहेत. अद्यापही जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे यात्रा काही काळासाठी थांबवण्यात आली होती. याशिवाय हवामान विभागाकडूनही रेड अलर्ट देण्यात आला होता.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, अर्धकुंवरी येथील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ भूस्खलन झालं. ही घटना दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांनी सांगितलं की, ही घटना टेकडीवर असलेल्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. हा रस्ता १२ किमी लांब आणि वळणदार आहे. रस्त्याच्या जवळजवळ अर्ध्या भागात भूस्खलन झाले. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
#WATCH | J&K: At least five people died and 10-11 injured in a landslide that occurred near Inderprastha Bhojnalaya at Adhkwari in Katra. Visuals from CHC Katra where the bodies and injured people have been brought. pic.twitter.com/3050IkeyCE
— ANI (@ANI) August 26, 2025
पुढील आदेशापर्यंत यात्रा स्थगित
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हिमकोटी मार्गावरील यात्रा सकाळपासूनच थांबवण्यात आली होती. मात्र जुन्या मार्गावरील यात्रा दुपारी १.३० वाजेपर्यंत सुरू होती. मात्र तुफान पावसामुळे अधिकाऱ्यांनी ही यात्रा पुढील आदेशापर्यंत स्थगित केली आहे.
यापूर्वी २३ जून रोजी माता वैष्णोदेवी मंदिराच्या नवीन यात्रा मार्गावर भूस्खलन झालें होते. त्यामुळे बॅटरी कार सेवा थांबवावी लागली होती. मात्र, मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, तेव्हापासून ही यात्रा जुन्या मार्गानेच सुरू होती.





