MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

गुजरातमध्ये मुख्यमंत्री वगळता सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ, कारण काय?

Written by:Rohit Shinde
गुजरातच्या राजकीय वर्तुळातून मोठी घडामोड समोर येत आहे. कारण मुख्यमंत्री वगळता इतर 16 मंत्र्यांंनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.

गुजरातच्या राजकारणातून एक खळबळजनक अशी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सोडून सर्वच मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. सर्व मंत्र्यांनी मुख्यंत्र्यांकडे राजीनामे सोपवले आहेत. भूपेंद्र पटेलांच्या निवासस्थानी अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सर्व 16 मंत्र्यांनी राजीनामे सोपवले. त्यानंतर आता गृहमंत्री अमित शाह देखील गुजरातमध्ये जाणार आहेत. सध्याच्या गुजरात मंत्रिमंडळात मुख्यमंत्री पटेल यांच्यासह 17 मंत्र्यांचा समावेश होता. यापैकी आठ कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते आणि तेवढेच राज्यमंत्री होते.

लवकरच नवे मंत्रिमंडळ

दिवाळीच्या अगदी तोंडावर गुजरात मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. आता सर्व राजीनामे राज्यपालांकडे सोपवले जातील. महत्त्वाचं म्हणजे सर्व मंत्र्यांचे राजीनामे खिशात होते, या राजीनामापत्रांवर सह्याही होत्या. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर सर्व मंत्र्‍यांनी खिशातून राजीनामे बाहेर काढले. नवीन मंत्र्यांचा शपथविधी उद्याच 17 ऑक्टोबर रोजी अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत होईल. भाजपच्या सर्व आमदारांना दोन दिवस गांधीनगरमध्ये राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्रिमंडळात समाविष्ट होण्याची अपेक्षा असलेल्या आमदारांना फोनवरून माहिती देण्यात आली आहे.

राजीनामा दिलेल्या मंत्र्यांमध्ये कोण?

कनुभाई देसाई – वित्त, ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल्स (पार्डी)

बलवंतसिंग राजपूत – उद्योग, कामगार आणि रोजगार (सिद्धपूर)

ऋषिकेश पटेल – आरोग्य, कुटुंब कल्याण आणि उच्च शिक्षण (विसनगर)

राघवजी पटेल – शेती, पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय (जामनगर ग्रामीण)

कुंवरजीभाई बावलिया – पाणीपुरवठा आणि नागरी पुरवठा (जसदन)

भानुबेन बाबरिया – सामाजिक न्याय आणि महिला आणि बाल विकास (राजकोट ग्रामीण)

मुलुभाई बेरा – पर्यटन, वन आणि पर्यावरण (खंभलिया)

कुबेर दिंडोर – शिक्षण आणि आदिवासी विकास (संत्रामपूर एसटी)

नरेश पटेल – गंडदेवी

बच्चूभाई खबर – देवगड बारिया

परशोत्तम सोळंकी – भावनगर ग्रामीण

हर्ष संघवी – मजुरा

जगदीश विश्वकर्मा निकोल म्हणून

मुकेशभाई झिनाभाई पटेल – ओलपाड

कुणवाजीभाई हलपती – मांडवी ( ST)

भिकूभाई चतुरसिंग परमार – मोडासा 

राष्ट्रीय संघटनेचे सरचिटणीस सुनील बन्सलही आज गुजरातला भेट देणार आहेत. मंत्र्यांचे राजीनामे राज्यपाल देवव्रत आचार्य यांना सादर केले जातील. राजीनाम्यांसोबतच नवीन मंत्र्यांची यादी राज्यपालांना सादर केली जाईल. त्यामुळे लवकरच गुजरातला नवे मंत्रिमंडळ मिळणार आहे.