नेहमीच कोणत्या ना कोणत्या राजकीय विषयांवर भाष्य करून, शरद पवार , उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका करून सर्वांचे लक्ष वेधणारे प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. येत्या काळात आपण लवकरच राजकीय आखाड्यात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत सदावर्ते यांनी दिले आहेत. एबीपी माझाला दिलेल्या एका मुलाखती दरम्यान सदावर्ते यांनी याबाबत माहिती दिली..
काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते? Gunaratna Sadavarte
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, माझ्या लाखो चाहत्यांच्या मनात आहे की मी राजकारणात उतरावं, त्यामुळे येणाऱ्या पाडव्यापर्यंत मी राजकारणात येईल. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांना वाहून घेतलेला माणूस आहे. त्याच्यामुळं मला ज्येष्ठ, गुरुवर्य ज्या क्षणाला सांगतील, राजकारणात थेट तुमची गरज आहे, नक्की डंके की चोट पे मी तुम्हाला राजकारणात दिसेल, असं गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलं. राजकारणाला अस्पृश्य समजत नाही, ती एक यंत्रणा आहे. देशाचे स्तंभ आहेत त्यापैकी एक स्तंभ आहे असेही त्यांनी म्हटले. Gunaratna Sadavarte
राज ठाकरेंवर टीका
काही दिवसांपूर्वी सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार शब्दात टीका केली. राज ठाकरे हे राजकारणातील नापास विद्यार्थी आहेत. राज ठाकरेंचं टन टन टोल झालं, भोंगे झाले त्यानंतर आता ठाकरे फक्त तोंडाची हवा घालत आहेत, असा घणाघात यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर केला. राज ठाकरे यांची पॉलिटिकल पार्टी डिस्क्रिमनिटीव आहे, ते प्रांतवाद करतात त्याच्या विरोधात आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत, असंही यावेळी सदावर्ते यांनी म्हटलं आहे.





