MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

Uddhav Thackeray Meet Raj Thackeray : उद्धव ठाकरे थेट राज ठाकरेंच्या घरी; समोर आलं महत्वाचं कारण

खरंतर मागील आठवड्यातच उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या दिपोस्तवाचे उद्घाटन पार पडलं होतं. आता चार दिवसातच उद्धव ठाकरे पुन्हा एकदा शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील ही गेल्या काही दिवसांमधील आठवी भेट आहे

मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल (Uddhav Thackeray Meet Raj Thackeray) झाले आहेत. राज ठाकरे यांच्या आई मधुवंती ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे शिवतीर्थ येथे दाखल झाले आहेत. ही भेट कौटुंबिक असली तरी या भेटीमुळे ठाकरे बंधूंमधील जवळीक आणखी वाढलेली पाहायला मिळते. तसेच राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.

राजकीय युती कधी होणार? Uddhav Thackeray Meet Raj Thackeray

खरंतर मागील आठवड्यातच उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या दिपोस्तवाचे उद्घाटन पार पडलं होतं. आता चार दिवसातच उद्धव ठाकरे पुन्हा एकदा शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील ही गेल्या काही दिवसांमधील आठवी भेट आहे (Uddhav Thackeray Meet Raj Thackeray) . मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले हे ठाकरे बंधू दिवसेंदिवस एकमेकांच्या आणखी जवळ येऊ लागले आहेत. राज ठाकरेंचे सातत्याने मातोश्रीवर जाणे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे शिवतीर्थावर जाणे असो, दोन्ही ठाकरे बंधूंचे बाँडिंग जमले असल्याचे स्पष्ट होत आहे. घर एकत्र असलं तरी राजकीय पटलावर शिवसेना आणि मनसेची युती कधी जाहीर होणार याकडे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागलं आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घोषणा केली होती की, मुंबईसह पाच महापालिका निवडणुका ठाकरे बंधू एकत्रित लढतील.

काँग्रेसचा ठाकरेंना विरोध?? 

एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील जवळीक वाढत असताना दुसरीकडे काँग्रेसचे मात्र ठाकरे बंधूंनाच तीव्र विरोध केला आहे. महापालिका निवडणुकीत आम्ही राज ठाकरेच काय, उद्धव ठाकरेंशी सुद्धा आघाडी करणार नाही असे स्पष्ट विधान काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नेत्यांच्या नसतात तर कार्यकर्त्यांच्या असतात. जे काँग्रेस कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन आहेत, त्यांचीही इच्छा असते, आपणही कधी ना कधी निवडणू लढवावी. त्यामुळे या निवडणुका कार्यकर्त्यांना लढू द्या. कोणी कोणासोबत लढायचे, हे स्थानिक कार्यकर्त्यांना ठरवू द्या. आम्ही मुंबईतील स्थानिक कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही मुंबईत स्वबळावर लढूयात, असं म्हणत भाई जगताप यांनी महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकला.