MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स एलिमिनेटर सामना; पंजाबच्या विरोधात क्वालिफायर 2 खेळण्याची संधी मिळवण्यासाठी लढत

Written by:Rohit Shinde
गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघात आयपीएलचा एलिमिनेटर सामना खेळला जात आहे. जिंकणाऱ्या संघाला पंजाब विरूद्ध क्वालिफायर 2 सामना खेळण्याची संधी मिळणार आहे.

क्वालिफायर २ च्या दृष्टीने आज एक महत्वाचा आणि 72 वा सामना आयपीएलमध्ये खेळला जात आहे. आयपीएलच्या 18 व्या मोसमातील एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स भिडणार आहेत. हा सामना आज होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. हा सामना जिंकणारा संघ क्वालिफायर 2 मध्ये पंजाब विरुद्ध भिडेल. तर पराभूत होणाऱ्या संघांचे आव्हान संपुष्ठात येईल. गुजरात आणि मुंबई दोन्ही संघ मोठ्या संघर्षानंतर या ठिकाणी पोहोचले असल्याने दोन्ही संघांसाठी विजयाचे महत्व मोठे आहे.

कोणत्या संघांचं पारडं जड?

गुजरात टायटन्सने या हंगामात मुंबई इंडियन्सला दोन्ही लीग सामन्यांमध्ये पराभूत केले आहे, त्यामुळे मानसिकदृष्ट्या त्यांना फायदा आहे. गुजरात टायटन्सने या हंगामात 9 विजयांसह तिसरे स्थान मिळवले आहे, तर मुंबई इंडियन्सने 8 विजयांसह चौथे स्थान मिळवले आहे. मुळांपूर येथील खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला मदत मिळते, तर स्पिनर्सला नंतर चांगला ग्रीप मिळतो. शुबमन गिल, कुसल मेंडिस, राशिद खान, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे या सामन्यात महत्त्वपूर्ण खेळाडू असू शकतात. सर्वसाधारणपणे, गुजरात टायटन्सला या सामन्यात फायद्याचे मानले जात आहे.

तथापि, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि कोणतीही टीम विजय मिळवू शकते. मुंबई इंडियन्सच्या अनुभवी खेळाडू आणि रणनीतीमुळे ते सामना जिंकू शकतात. सामन्याच्या दिवशी हवामान, खेळपट्टीची स्थिती आणि खेळाडूंच्या फॉर्मनुसार निकाल ठरू शकतो.

जिंकणारा संघ क्लालिफायर २ खेळणार

क्वालिफायर १ सामन्यात आरसीबीकडून पंजाबला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता पंजाब किंग्सला आणखी एक संधी मिळत असल्याने संघ क्वालिफायर २ सामना खेळेल, आज मुंबई विरूद्ध गुजरात सामन्यात जो संघ विजय प्राप्त करेल, तो संघ क्वालिफायर 2 मध्ये पंजाब किंग्सला भिडणार आहे. अशा परिस्थितीत मुंबई आणि गुजरात दोन्ही संघांसाठी आजचा हा सामना महत्वाचा असणरा आहे, आज पराभूत होणारा संघ आयपीएलमधून बाहेर होणार आहे.