गुवाहाटी टेस्टमध्ये टीम इंडियाच्या पराभवाची 5 मोठी कारणे; दक्षिण आफ्रिकेने केला सुपडा साफ

Jitendra bhatavdekar

दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटीमध्ये भारताला तब्बल 408 धावांनी पराभूत करून 2 सामन्यांची टेस्ट मालिका 2-0 ने जिंकली. दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडिया प्रत्येक विभागात अपयशी ठरली. या पराभवाच्या 5 मोठ्या कारणांपैकी एक म्हणजे कोच गौतम गंभीर यांची रणनीती, जी गुवाहाटीत पूर्णपणे फेल ठरली. ऋषभ पंतच्या नेतृत्वातही अनुभवाची कमतरता स्पष्टपणे दिसून आली.

बॅटिंग ऑर्डरबाबतचा गोंधळ अद्याप कायम आहे. पहिल्या टेस्टमध्ये वॉशिंग्टन सुंदरला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्यात आले आणि त्याने चांगली फलंदाजीही केली. मात्र दुसऱ्या टेस्टमध्ये साई सुदर्शनच्या समावेशामुळे सुंदरला पुन्हा खालच्या क्रमांकावर जावे लागले.

ताज्या बातम्या