India vs Pakistan Asia Cup Match 2025: भारताचा कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना म्हटलं की दोन्ही देशाचे एक प्रकारचे धर्म युद्ध असते. आशिया कप 2025 स्पर्धेत साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर आता उद्या (रविवारी) पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान भिडणार आहेत.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीम्स टुर्नामेंटच्या ग्रुप ए मधून सुपर 4 साठी क्वॉलिफाय ठरल्या आहेत. दोन्ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील मॅच सुपर 4 मध्ये होणार आहे. त्यामुळे आता भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना उद्या रंगणार असून, या सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागले आहे.
भारताचा पाकवर सात विकेटनी दणदणीत विजय
दरम्यान, गेल्या सामन्यात टीम इंडियानं पाकिस्तानचा सात विकेट्स राखून दणदणीत पराभव केला होता. पाकिस्ताननं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा घेतलेला निर्णय त्यांच्या अंगलट आल्याचं दिसलं. अवघ्या 127 रन्सचं टार्गेट 20 ओोव्हर्समध्ये टीम इंडियाला देण्यात आलं. मात्र टीम इंडियानं अवघ्या सोळाव्या ओव्हरमध्ये विजय संपादित केला आहे. आशिया कपमध्ये टीम इंडियानं विजय मिळवत पाकिस्तानला क्रिकेटमध्येही त्यांची जागा दाखवून दिली. टीम इंडियानं 10 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 93 रन्स केल्या होत्या. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमारनं साजेशी कामगिरी करत संघाला विजयी केले.
भारत-पाकिस्तान मॅच कोणत्या चॅनेल लाईव्ह दिसणार?
- सोनी स्पोर्ट्स 1
- सोनी स्पोर्ट्स 3 (हिंदी)
- सोनी स्पोर्ट्स 4
- सोनी स्पोर्ट्स 5
मॅच कुठे आणि किती वाजता होणार?
आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर 4 मॅच दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. ही मॅच दुबईमध्ये सांयकाळी 6.30 वाजता सुरू होईल. ही मॅच भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. मात्र नाणेफेक सांयकाळी 7.30 वाजता होईल. यानंतर आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल.
कोणत्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन टेलिकास्ट?
भारत-पाकिस्तान मॅचचे ऑनलाइन स्ट्रीमिंग सोनी लिव्ह अॅप किंवा वेबसाईटवर पाहता येईल. सोनी लिव्ह अॅप व्यतिरिक्त, फॅनकोड अॅप आणि वेबसाईट आशिया कप 2025 मॅचचे थेट प्रक्षेपण देखील करत आहे. सध्या फॅनकोड वेबसाईटवर या मॅचसाठी एन्ट्री फी 189 रुपये आहे.











