MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

गुजरातचा दणदणीत विजय, केकेआरचा धुव्वा

Written by:Arundhati Gadale
का बाजुने विकेट पडत असताना कर्णधार अजिंक्य राहणे याने आपली आक्रमक बॅटींग सुरूच ठेवले. 36 चेंडूत 50 धावा करणारा अजिंक्य सुंदरच्या बाॅलवर चकला आऊट झाला.

कोलकाता नाईट रायटर्सला आयपीएलच्या हंगामात सूर गवसताना दिसत नाही. आज ईडन गार्डनरवर झालेल्या सामान्यात कोलकाताला सपाटून मार खावा लागला. गुजरातने 39 धावांनी कोलकातावर विजय मिळवला.

199 धावांचे टार्गेट घेऊन मैदानात उतरेल्या कोलकताने अवघ्या दोन रन्स असताना गुरुबाजच्या रुपाने पहिली विकेट गमावली. मोहम्मद सिराजने त्याला पायचित केले. त्यानंतर अजिंक्य राहणे आणि सुनिल नारायण यांनी आक्रमक फटकेबाजी केली. केली मात्र धोकादायक ठरू पाहणाऱ्या सुनील नारायणला राशीद खानने कॅच आऊट केले.

अजिंक्यची आक्रमक खेळी

एका बाजुने विकेट पडत असताना कर्णधार अजिंक्य राहणे याने आपली आक्रमक बॅटींग सुरूच ठेवले. 36 चेंडूत 50 धावा करणारा अजिंक्य सुंदरच्या बाॅलवर चकला आऊट झाला. मोठे फटके खेळ्यात पटाईत असलेले रिंकु सिंग आणि अॅण्ड्रे रसल फार चमक दाखवू शकले नाही. ते अनुक्रमे 17 आणि 21 धावांवर बाद झाले.

सुदर्शन-गीलची विक्रम पार्टनरशिप

प्रथम बॅटिंग करणाऱ्या गुजरातने कोलकातासमोर धावांचा डोंगर उभा केला. साई सुदर्शने पुन्हा एक अर्धशतक झळकावले तर कर्णधार शुभमन गिल याने आक्रमक 90 धावांची खेळ उभारली. सुदर्शन आणि गिलेन विक्रमी 114 धावांची सलामी दिली. 114 धाव 12 ओव्हरमध्ये झालेल्या असताना रसलच्या ओव्हरमध्ये सुदर्शन आऊट झाला.