IPL 2025 MI SRH: आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्समध्ये मुकाबला, कोण जिंकणार?

Rohit Shinde

मुंबई: आयपीएल 2025च्या हंगामातील 33 वा सामना आज खेळला जात आहे. मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद या संघांमध्ये आज संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना सुरू होईल. दोन्ही संघांसाठी हा सिझन तितका फायदेशीर राहिलेला नाही. दोेन्ही संघ आपलं आव्हान कायम ठेवण्याच्या प्रयत्नात आज असणार आहेत.

कोण कुणावर भारी पडणार?

तुलनात्मक दृष्ट्या दोन्ही संघांचा विचार केला असता लक्षात येते की, 6 पैकी 2 सामने जिंकत मुंबई इंडियन्स संघाने 4 गुण मिळवले आहेत. संघ 7 व्या स्थानावर आहे. दुसरीकडे मुंबईला  4 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. हैदराबादच्या संघाच्या बाबतीत देखील परिस्थिती फार वेगळी नाही. खेळलेल्या 6 पैकी 2 सामन्यांत सनरायजर्सना विजय मिळवता आला आहे. तर संघाकडे अवघे 4 पॉईंट्स आहेत. आजवर 4 सामन्यांत हैदराबादला पराभवाची धूळ चाखावी लागली आहे.

आयपीएलच्या इतिहासात आजवर दोन्ही संघ 23 वेळा आमनेसामने आले असता, यापैकी हैदराबादने 10 सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे 13 सामन्यांमध्ये मुंबईने विजय मिळवला आहे. थोडक्यात मुंबईचं पारडं जड मानलं जात असलं तरी हैदराबाद संघाच्या आशा देखील पल्लवीत आहेत.

दोन्ही संघाचे प्लेयिंग इलेव्हन:

मुंबईच्या संघाचा कॅप्टन हार्दीक पांड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा, सुर्यकुमार यादव, विल जॅक्स यांच्यावर संघाच्या फलंदाजीची मदार असणार आहे. तर मिशेल सँटनर, अर्जुन तेंडुलकर, दिपक चाहर, मुजीब रहमान, कर्ण शर्मा यांच्यावर मुंबई संघांच्या गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे.

हैदराबादला गुणतालिकेत सुधारणा करायची असेल तर हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. त्यासाठी कॅप्टन पॅट कमिन्सला योग्य नियोजन साधावे लागणार आहे. नितीश रेड्डी, अभिनव कुमार, ट्रेविस हेड, इशान किशन यांना उत्तम फलंदाजी करावी लागेल. तर दुसरीकडे संघाच्या गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे. पॅठ कमिन्स, जयदेव उनाडकट, हर्षद पटेल यांना ही जबाबदारी सांभाळावी लागेल.

एकंदरीतच आजचा सामना अटीतटीचा होण्याची शक्यता आहे. यात मुंबई जिंकण्याची शक्यता असली तरी हैदराबादचा संघ ताकदीने लढेल,

ताज्या बातम्या