MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

मुंबई वि. पंजाब क्वालिफायर 2 सामना; पाऊस अख्खा गेम पलटणार?

Written by:Rohit Shinde
आज क्वालीफायर-2 सामना खेळण्यात येईल. पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघात हा सामना होईल. गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळण्यात येईल. सध्या अहमदाबादवर काळ्या ढगांची गर्दी जमली आहे. त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गुजरात टायटन्सला पराभवाची धूळ चाखत मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल 2025 च्या क्वालिफायर 2 सामन्यात पोहोचला आहे. आज संध्याकाळी ठिक 7.30 वाजता पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांत क्वालिफायर 2 सामना खेळला जाईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. पहिल्या क्वालिफायरमध्ये पंजाबला  बंगळुरूकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आता क्वालिफायर दोन सामना जिंकत नेमका कोणता संघ फायनलमध्ये जाणार असा सवाल क्रिकेट प्रेमींना पडला आहे. परंतु या होणाऱ्या सामन्यावर पावसाचं सावट असल्याची माहिती आहे.

अहमदाबादमध्ये पाऊस झाला तर…

आज अंतिम सामन्यापूर्वीच्या पात्रता फेरीचा सामना पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्समध्ये होत आहे. हा सामना अहमदाबाद स्टेडियमवर खेळण्यात येईल. दुपारी तापमान 34 डिग्रीच्या जवळपास असेल. तर संध्याकाळी 6 वाजता तापमान घसरण्याची शक्यता आहे. या सामन्यासाठी 7 वाजता नाणेफेक होईल. त्यावेळीच पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी हवेतील आर्द्रता 55 टक्के ततर हवा ताशी 18 किमी वेगाने वाहिल. सामन्यापूर्वीच जर पावसाचे आगमन झाले तर त्याचा परिणाम सामन्यावर होईल.

पावसाने पिच नरम होईल. त्यामुळे खेळ संथ होण्याची शक्यता आहे. याचा फायदा गोलंदाजांना नक्कीच होईल. फलंदाजांना या पिचवर तडाखेबंद खेळीसाठी खासा मेहनत करावी लागण्याची शक्यता आहे. पण जर केवळ पावसाचे शिंतोडे आले, हलक्या सरी बरसल्या तर फलंदाजांना त्याचा फायदा होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने गोलंदाजीचा पर्याय निवडणे फायदेशीर ठरू शकते. अशा परिस्थितीत पाऊस झाला तर पंजाब किंग्स फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.

MI VS PBKS कुणाचं पारडं जड?

दरम्यान मुंबईपेक्षा पंजाब किंग्सने 18 व्या मोसमात साखळी फेरीत दमदार कामगिरी केली. पंजाबने 14 पैकी 9 सामने जिंकले. तर पंजाबला 4 वेळा पराभूत व्हावं लागलं. तसेच पंजाबचा 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे पंजाबच्या खात्यात 19 पॉइंट्स होते. तर पंजाबचा नेट रनरेट हा साखळी फेरीनंतर +0.372 असा होता.

तर दुसऱ्या बाजूला मुंबईने पंजाबच्या तुलनेत 1 सामना कमी जिंकलाय. मात्र मुंबईचा नेट रनरेट इतर सर्व संघाच्या तुलनेत चांगला आहे. मुंबईने साखळी फेरीतील 14 पैकी 8 सामने जिंकले. तर पलटणला 6 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईचा 16 गुणांसह नेट रनरेट हा +1.142 असा होता.

दोन्ही संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा, जॉनी बेयरस्‍टो, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, चरित असलंका, हार्दिक पांड्या (कॅप्टन), नमन धीर, मिचेल सैंटनर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्‍ट और जसप्रीत बुमराह

पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन

प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्य, जोश इंगलिस, श्रेयस अय्यर (कॅप्टन), नेहल वढेरा, शशांक सिंह, मार्कस स्टोइनिस, अजमतुल्लाह उमरजई, हरप्रीत बराड़, काइल जैमीसन, विजयकुमार वैशाख/युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह