एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्मृति मंधानाने रचला इतिहास, विराट कोहलीचा विक्रम मोडत क्रिकेट जगताला दिला धक्का

महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये ही एका खेळाडूची सर्वात जलद अर्धशतक होती. त्यानंतर मानधनाने तिचे शतक पूर्ण करण्यासाठी आणखी २५ चेंडू घेतले. मानधनाने ५० चेंडूत तिचे शतक पूर्ण करून इतिहास रचला.

Smriti Mandhana Record Fastest Hundred by Indian in ODI : क्रिकेट विश्वातून एक रेकॉर्ड ब्रेक बातमी येत आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या महिला एकदिवसीय सामन्यात स्मृती मानधनाने इतिहास रचला आहे. प्रतिका रावलसोबत डावाची सुरुवात करणाऱ्या स्मृती मानधनाने पहिल्याच चेंडूवर धमाकेदार फटकेबाजी केली. तिने फक्त २३ चेंडूत तिचे पहिले अर्धशतक पूर्ण केले. महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये ही एका खेळाडूची सर्वात जलद अर्धशतक होती. त्यानंतर मानधनाने तिचे शतक पूर्ण करण्यासाठी आणखी २५ चेंडू घेतले. मानधनाने ५० चेंडूत तिचे शतक पूर्ण करून इतिहास रचला.

भारताकडून सर्वात जलद एकदिवसीय शतक

दरम्यान, स्मृती मानधना आता एकदिवसीय शतक करणारी सर्वात जलद भारतीय खेळाडू ठरली आहे. तिने विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. २०१३ मध्ये विराट कोहलीने जयपूर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५२ चेंडूत शतक झळकावले होते. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर वीरेंद्र सेहवाग आहे, ज्याने न्यूझीलंडविरुद्ध ६० चेंडूत शतक झळकावले होते. आता या दोघांनाही स्मृति मंधानाने मागे टाकत इतिहास रचला आहे. आपल्या स्फोट खेळीमुळे स्मृति मंधानाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वांनाच धक्का दिला आहे.

भारताकडून सर्वात जलद वनडे शतक (पुरुष या महिला)

  • 50 – स्मृति मंधाना विरुद्ध ऑस्ट्रेलिया-महिला, दिल्ली, 2025
  • 52 – विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया, जयपुर, 2013
  • 60 – वीरेंद्र सहवाग विरुद्ध न्यूजीलैंड, हैमिल्टन, 2009
  • 61 – विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया, नागपूर, 2013
  • 62 – मोहम्मद अझरुद्दीन विरुद्ध न्यूज़ीलैंड, बड़ौदा, 1988
  • 62 – केएल राहुल विरुद्ध नीदरलैंड्स, बेंगलुरु, 2023

About Author

Astha Sutar

Other Latest News