MP Breaking News
Fri, Dec 12, 2025

भारताच्या गुकेशने इतिहास रचला, सर्वोत्तम बद्धीबळपटू मॅग्नस कार्लसनला हरवलं

गुकेशने विजयाच्या क्षणी कोणताही आक्रमक आनंद व्यक्त केला नाही. त्याने फक्त कार्लसनशी हस्तांदोलन केले आणि शांतपणे आपल्या खुर्चीतून उठून हात तोंडावर ठेवत एका कोपऱ्यात उभा राहिला.
D Gukesh beat Magnus Carlsen: वर्ल्ड चॅम्पियन गुकेश डी याने ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. त्याने नॉर्वे चेस २०२५ च्या सहाव्या फेरीत माजी वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनचा क्लासिकल टाइम कंट्रोल प्रकारात पहिल्यांदाच पराभव केला. या पराभवामुळे कार्लसन प्रचंड संतापलेला दिसला. चिडलेल्या कार्लसन याने चक्क रागाच्या भरात बुद्धिबळाच्या पटावर जोराने ठोसा मारला, यामुळे उपस्थित सगळेच थक्क झाले.

गुकेशने पुन्हा मोठा पराक्रम केला

गुकेशकडून पराभूत झाल्यानंतर मॅग्नस कार्लसन आपल्या रागावर ताबा ठेवू शकला नाही. मात्र त्याला लगेचच आपली चूक लक्षात आली आणि त्याने तत्काळ माफी मागत गुकेशला विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या.

गुकेशचे संयमी सेलिब्रेशन

गुकेशने विजयाच्या क्षणी कोणताही आक्रमक आनंद व्यक्त केला नाही. त्याने फक्त कार्लसनशी हस्तांदोलन केले आणि शांतपणे आपल्या खुर्चीतून उठून हात तोंडावर ठेवत एका कोपऱ्यात उभा राहिला. जणू असे वाटत होते की, त्याला आपण माजी वर्ल्ड नंबर १ला हरवल्याचा विश्वास बसत नव्हता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

 

गुकेशचे जबरदस्त पुनरागमन

१९ वर्षीय डी गुकेश पहिल्या फेरीत मॅग्नस कार्लसनकडून पराभूत झाला होता. त्या विजयानंतर कार्लसनने एक पोस्टही केली होती, ज्यामध्ये त्याने लिहिले होते, “जेव्हा तुम्ही राजाच्या विरोधात खेळता, तेव्हा चुका करू नयेत.” यामधून ते बहुधा हे सांगू इच्छित होता, की त्याला हरवणे फारच अवघड आहे. मात्र गुकेशने आपल्या खेळातूनच याला योग्य उत्तर दिले.

पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना गुकेशने संपूर्ण डावात संयम आणि शिस्त टिकवून ठेवली. इनक्रिमेंट टाइम कंट्रोलमध्ये त्याने कमालची पुनरागमन केले, कारण त्याआधी बहुतांश वेळ कार्लसन आघाडीवर होता. गुकेशने कार्लसनच्या एका चुकिचा अचूक फायदा घेत संपूर्ण डावाची दिशा बदलली. अखेरीस, एका अप्रतिम काउंटर-अटॅकसह गुकेशने सामना जिंकून दाखवला.