अभिनेत्री लारा दत्ताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, वडिलांचे निधन

सोशल मीडिया व्हिडिओमध्ये, दत्ता कुटुंबीय एल. के. दत्तांना शेवटचा निरोप देण्यासाठी पोहोचलेले दिसत आहेत. लारा दत्ता पती महेश भूपतीसोबत दिसली.

Lara Dutta Father Lk Dutta Passes Away : स्टार अभिनेत्री लारा दत्ता हिच्यावर सध्या दुखाचा डोंगर कोसळला आहे. तिचे वडिल रिटायर्ड विंग कमांडर एल. के. दत्ता यांचे निधन झाले असून, संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले आहे. लारा दत्ताचे वडील ८४ वर्षांचे होते. लारा पती महेश भूपतीसह वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होती.

याचे काही फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवरून समोर आले आहेत. दरम्यान, लाराच्या वडिलांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

समोर आलेल्या सोशल मीडिया व्हिडिओमध्ये, दत्ता कुटुंबीय एल. के. दत्तांना शेवटचा निरोप देण्यासाठी पोहोचलेले दिसत आहेत. लारा दत्ता पती महेश भूपतीसोबत दिसली. लाराचे वडील एल. के. दत्त यांचे अंत्यसंस्कार ३१ मे रोजी मुंबईत करण्यात आले. मात्र, अद्याप कुटुंबाच्या वतीने यासंदर्भात कोणतेही अधिकृत वक्तव्य देण्यात आलेले नाही.

अवघ्या १८ दिवसांपूर्वी ८४ वा वाढदिवस साजरा झाला

लारा दत्ताच्या वडिलांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर चाहत्यांनी अभिनेत्रीचे सांत्वन करण्यास सुरुवात केली. अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी लारा दत्ताने तिच्या वडिलांचा ८४ वा वाढदिवस साजरा करणारी एक पोस्ट शेअर केली होती. त्याच वेळी, लाराने एका मुलाखतीत सांगितले की तिचे वडील अनेक वर्षांपासून इंदिरा गांधींचे वैयक्तिक पायलट होते.

फोटो शेअर करून दिवसाचे महत्व सांगितले

त्यानंतर लारा दत्ताने पोस्टमध्ये सांगितले की तिच्या वडिलांचा वाढदिवस तिच्यासाठी किती खास आहे, कारण तो दिवस मिस युनिव्हर्सचा मुकुट जिंकल्याचा २५ वा वर्धापन दिन होता. लारा दत्ताने तिच्या वडिलांसोबतचे स्वतःचे फोटो आणि घरी आयोजित केलेल्या पूजेचे इंस्टाग्रामवर शेअर केले आणि लिहिले, ‘काल अनेक भावनांनी भरलेला दिवस होता… १२ मे… माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस. फक्त माझ्या वडिलांचा वाढदिवसच नाही तर २५ वर्षांपूर्वी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकण्याचा दिवसही. वेळ खरोखरच कसा निघून जातो.’


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News