मुंबई- सुपरस्टार आणि अनेक तरुणींच्या ह्रदयात स्थान असणाऱ्या सिने अभिनेता सलमान खानबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सलमान खानच्या मेंदूमध्ये एनेयूरिज्म आहे आणि एव्ही मालफॉर्मेशन असल्याची माहिती सलमाननचं दिलीय. एनेयूरिज्म अशी स्थिती आहे की ज्यात ब्रेनमधील नसा फुलतात आणि त्या फाटल्या तर जीवघेणा स्ट्रोक होण्याची शक्यता असते.
कपिल शर्माच्या शोमध्ये सलमान खाननं याची माहिती दिली आहे. या गंभीर वैद्यकीय स्थितीत चित्रपटांत काम करत असल्यांही सलमाननं यावेळी सांगितलंय. दररोज हाड तोडण्याचा अभिनय करतो, अशी माहिती सलमाननं दिलीय.

पहिल्यांदा कधी सांगितलं होतं सलमाननं या आजाराविषयी?
सलमाननं त्याला असलेल्या ट्रायजेमिनल न्यूरेल्जियाबाबत पहिल्यांदा 2017 साली दुबईत ट्यूबलाईट सिनेमाच्या प्रमोशनवेळी पहिल्यांदा जाहीरपणे भाष्य केलं होतं. ही एक न्यूरोलॉजिकल समस्या आहे, यात चेहऱ्यावरील रक्तवाहिनीत प्रचंड त्रास होतो. यामुळे बोलणे, जेवणे किंवा तोंड धुण्यासारख्या नियमित बाबीही प्रचंड त्रासदायक वाटत राहतात.
अल्लाहनं जितकं आय़ुष्य दिलंय तितकं जगेन- सलमान
सलमान खान गेल्या काही महिन्यांपासून लॉरेन्स गँगकडून मिळत असलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे चर्चेत आहे. मार्चमध्ये सलमान खाननं याबाबत पहिल्यांदा मौन सोडत जाहीर प्रतिक्रिया दिली होती. सिकंदर सिनेमाच्या प्रमोशनच्या पत्रकार परिषदेत त्यानं या विषयावर मत प्रदर्शित केलं होतं. अल्लानं जितकं आयुष्य लिहिलं आहे तितकं जरुर जगेन असं यावेळी सलमान म्हणाला होता.
सलमानची सुरक्षा या धमक्यांनंतर वाढवण्यात आली होती. त्यावर इतक्या सगळ्या सुरक्षारक्षकांना सोबत घेऊन चालताना अडचण येते, असंही सलमान म्हणाला होता.
सलमान खानला वाय प्लस सुरक्षा
२०२३ साली सलमान खानला आलेल्या धमक्यांनंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वतीनं त्याला वाय प्लस सुरक्षा देण्यात आलीय. ११ जवान सदैव सलमानसोबत असतात. यात एक ते दोन हे कमांडो असतात. काळवीट शिकार प्रकरणानंतर सलमान खानला जीवे मारण्याची धमकी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईकडून सातत्यानं देण्यात येतेय. एप्रिल २०२४ साली सलमानच्या बांद्रा येथील घरावर गोळीबारही करण्यात आला होता.











