हनी सिंगने एकाचवेळी काढले खास टॅटू, म्हणाला…!

प्रसिद्ध रॅपर आणि गायक यो यो हनी सिंगने पहिल्यांदाच आपल्या शरीरावर टॅटू काढण्याचा निर्णय घेतला, तोही थेट तीन टॅटूंचा एकत्र अनुभव घेत. त्यांच्या चाहत्यांनी त्याचा टॅटूचे खूप कौतुक केले आहे. पाहूयात त्याने टॅटूंमध्ये काय-काय काढले?

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंगने नुकतेचं नवीन 3 टॅटू काढले आहे. हनी सिंगने त्याच्या शरीरावर पहिल्यांदाच टॅटू काढले आहेत. विशेष म्हणजे, त्याने त्याच्या आईसोबतच आणखी एका व्यक्तीसाठी हे टॅटू काढले आहेत. त्याने हे तीन टॅटू त्याचा सगळ्यात जवळच्या लोकांसाठी काढले आहे. पाहूयात नेमकं काय आहे या टॅटूमध्ये….

आईसाठी काढला खास टॅटू

हनी सिंगने इंस्टाग्रामवर त्याचा पहिला टॅटू दाखवला. हनी सिंगने त्याच्या पहिल्या टॅटूच्या कॅप्शनमध्ये “माझा पहिला टॅटू झाला!! माझ्या आईची सही” असे लिहिले आहे. त्याने त्याच्या आईची सही आणि तिच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाचे चित्र असलेला टॅटू काढला आहे. त्याने हा टॅटू सोशल मीडियावर शेअर केला आणि “पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत महिला” म्हणून आपल्या आईचा उल्लेख केला. सोनू सूद, शहनाज गिल यांनी त्याच्या टॅटूचे कौतुक केले.

 

“माझ्या लेजेंडसाठी तिसरा टॅटू!”

हनी सिंगने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान यांच्याबद्दल प्रेम व्यक्त केले आहे. त्याने लिहिले आहे की, “माझ्या लाडक्या ‘लिव्हिंग लेजेंड’ @arrahman सर यांच्यासाठी एका रात्रीत बनवलेला हा माझा तिसरा टॅटू! मी तुमच्यावर प्रेम करतो सर, सर्व गोष्टींसाठी धन्यवाद.”  या पोस्टमध्ये, हनी सिंगने ए.आर. रहमान यांच्यासाठी एक खास टॅटू बनवल्याचे सांगितले आहे. त्याने हा टॅटू ए.आर. रहमान यांच्यासाठी समर्पित केला आहे आणि त्यांच्या संगीतासाठी कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

दुसरा टॅटू

हनी सिंगने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये दुसरा टॅटू काढल्याचं सांगितलं आहे, पण तो टॅटू कशाबद्दल आहे हे उघड केलेलं नाही. त्याने सांगितले की, तो टॅटू “खूप खास” आहे.  हनी सिंगने एकाच रात्रीत तीन टॅटू काढले. पहिला टॅटू त्याच्या आईच्या सहीचा होता, आणि तिसरा टॅटू संगीतकार ए.आर. रहमान यांच्या सहीचा होता,. पण दुसरा टॅटू कोणाचा आहे, हे त्याने सांगितले नाही. त्याने सांगितले की, तो टॅटू “अत्यंत खास” आहे आणि तो कोणालाही दाखवणार नाही.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News