बॉलिवूडमधील शाही विवाह फक्त 37 पाहुणे, पण खर्च 77 कोटी; कोण आहेत हे स्टार कपल

रणवीर-दीपिका, अनुष्का-विराट, प्रियांका-निक जोनास हे स्टार जोडपे आहेत ज्यांनी त्यांच्या लग्नात खूप पैसे खर्च केले. असेही एक जोडपे आहे ज्यांच्या लग्नात फक्त ३७ पाहुणे उपस्थित होते, तरीही त्यांच्या लग्नात सुमारे ७७ कोटी रुपये खर्च आला.

बॉलिवूड स्टार्सना शाही विवाह करण्याची आवड वाढली आहे, विशेषतः गेल्या 10-12 वर्षांत. पूर्वीच्या तुलनेत आता ते अधिक मोठे आणि थाटामाटाचे लग्न करताना दिसतात. बॉलिवूड स्टार्स आता त्यांच्या लग्नासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करताना दिसतात, ज्यात आलिशान स्थळे, डिझायनर कपडे, आणि मोठे सेलिब्रेशन यांचा समावेश असतो. शाही विवाहसोहळे हे त्यांच्या प्रसिद्धीचा आणि जीवनशैलीचा भाग बनले आहेत, ज्यामुळे ते चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतात. अनेक बॉलिवूड जोडप्यांनी भव्य आणि शाही विवाहसोहळे केले आहेत, ज्यामुळे त्यांची लोकप्रियता आणखी वाढली आहे. रणवीर सिंग-दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा-विराट कोहली, प्रियांका चोप्रा-निक जोनास, विकी कौशल-कतरिना कैफ, आलिया भट्ट-रणबीर कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी ही स्टार जोडपी आहेत ज्यांनी त्यांचे लग्न खूप पैसे खर्च करून संस्मरणीय बनवले. या जोडप्यांमध्ये एक जोडपं असं आहे ज्यांच्या लग्नात फक्त 37 लोकांची हजेरी होती पण खर्च मात्र 77 कोटी. वाचूनच तुम्हाला शॉक बसला असेल पण हे कपल नेमकं आहे तरी कोण? याविषयी जाणून घेऊया….

लग्नात फक्त 37 लोकांची हजेरी होती

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय स्टार कपल आहे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण. 2018 मध्ये या जोडप्याने इटलीच्या लेक कोमो येथे अतिशय शाही आणि खाजगी पद्धतीने लग्न केले. या लग्नाची चर्चा आजही होते कारण त्यावर तब्बल 77 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला होता आणि विशेष म्हणजे लग्नाला केवळ 37 जवळचे पाहुणे उपस्थित होते. दीपिका आणि रणवीरचे लग्न दोन दिवसीय भव्य समारंभात झाले. कोंकणी पद्धतीने 14 नोव्हेंबरला आणि सिंधी पद्धतीने 15 नोव्हेंबरला विवाह सोहळा पार पडला. रणवीरने त्याच्या बारातींसह समुद्री विमानातून शानदार एंट्री केली होती.

प्रेमकहाणी कधी आणि कुठून सुरू झाली?

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणची पहिली भेट संजय लीला भन्साळीच्या ‘गोलियों की रासलीला: रामलीला’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. चित्रपटाच्या रिलीज डेटशी जुळवून दोघांनी 15 नोव्हेंबर 2018 रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला.‘रामलीला’च्या यशानंतर दोघांनी ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. 8 सप्टेंबर 2024 रोजी या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलीला जन्म दिला, जिचे नाव त्यांनी ‘दुआ’ ठेवले आहे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News