बॉलिवूड इंडस्ट्रीतले प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांनी जिममध्ये न जाता, तब्बल 26 किलो वजन कमी करून इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. बोनी कपूरच्या नवीन लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. बोनी कपूरचे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. चाहते त्यांचा स्टायलिश आणि फ्रेश लुक खूप पसंत करत आहेत. अनेकांनी त्यांचे कौतुक केले, तर काहींना त्यांनी इतका मोठा बदल कसा केला हे जाणून घेण्याची उत्सुकता होती.
बोनी कपूर यांनी 26 किलो वजन कसं कमी केलं?
निर्माता बोनी कपूर यांनी जिमला न जाता 26 किलो वजन कमी करून सर्वांनाच धक्का दिला आहे. त्यांचे फोटो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. दिवंगत पत्नी श्रीदेवीकडून प्रेरणा घेत आपण हे केल्याचे त्यांनी सांगितले आहे. बोनी कपूर यांच्या वजन कमी करण्याचं रहस्य त्यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीत आहे. बोनी कपूर रात्री जेवत नाहीत आणि रात्री ते फक्त सूप पितात. त्यांचा नाश्ता फळांचा रस आणि ज्वारीची भाकरी एवढाच असतो. तसेच त्यांनी कोणतंही वर्कआऊट रुटिन फॉलो केलेलं नाही. बोनी कपूर दृढ इच्छाशक्ती आणि आहारावरच्या नियंत्रणावर लक्ष केंद्रीत करतात.

श्रीदेवी यांच्याबाबत काय म्हणाले बोनी कपूर?
आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये केलेल्या बदलांमागे श्रीदेवी यांचं इंस्पिरेशन आहे, असं बोनी कपूर यांनी सांगितलं. ते म्हणाले की, “हेअर ट्रान्सप्लांटपूर्वी वजन कमी करावं अशी माझ्या पत्नीची इच्छा होती, म्हणून मी डाएटिंग सुरू केलं आणि सुमारे 14 किलो वजन कमी केलं. व्यायाम करणं माझ्यासाठी कठीण आहे, परंतु तरीही मी वजन कमी करण्यात यशस्वी झालो.” दिवंगत पत्नी श्रीदेवीने त्यांना त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी प्रेरित केले.
View this post on Instagram
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











