अभिनेत्री विद्या बालनला इंडस्ट्रीमध्ये 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. तिने परिणीता या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात ती सैफ अली खानच्या अपोजिट भूमिकेत होती. विद्या बालन आज टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. जिने अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. एका मुलाखतीत तिने एका चित्रपटात इंटिमेट सीन शुटदरम्यान तिच्यासोबत घडलेला एक विचित्र किस्सा तिने सांगितला.
विद्या बालनने इंटिमेट सीन्सबद्दल काय सांगितलं?
एका मुलाखतीत तिने सांगितले की, ‘एका चित्रपटात इंटेमेट सीन होता. आणि त्यावेळी एक अभिनेता चायनीज खाऊन आला होता. आणि सीनच्या आधी त्याने दातही घासले नव्हते. तरीही मी त्याच्यासोबत एक इंटिमेट सीन केला. त्या सीनदरम्यान त्यांना एकमेकांच्या खूप जवळ यावं लागलं. विद्या म्हणाली, ‘मी खूप नवीन होते, खूप घाबरले होते. मी स्वतःला विचारलं, तुला जोडीदार नाही का? मी त्याला मिंटसुद्धा नाही दिलं’
मी एक आशावादी आहे
विद्याने या अनुभवांवरून इंडस्ट्रीत अभिनेत्रींसमोर येणाऱ्या आव्हानांची जाणीव होते. त्याच मुलाखतीत विद्याने सांगितलं की आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणीवरही भाष्य केलं. म्हणाली, ‘मला स्वतःवर विश्वास आहे, मी एक आशावादी आहे.’ विद्यानं सांगितलं की, तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक लोकांनी तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला. पण तिनं कधीही स्वतःला चुकीचं मानलं नाही आणि तिच्या गुणांवर विश्वास ठेवला. ती म्हणाली, ‘मला वाटतं की माझा हा दृष्टिकोन माझी सर्वात मोठी ताकद बनला.’
टीव्ही ते बॉलिवूडचा प्रवास
विद्याने कारकिर्दीची सुरुवात ‘हम पांच’ या लोकप्रिय टीव्ही शोमधून केली होती. त्यानंतर तिने चित्रपटांकडे वळत हळूहळू बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक म्हणून आपली ओळख निर्माण केली.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)