नवी दिल्ली- केंद्र सरकारनं शुक्रवारी अश्लील कन्टेन्ट प्रसारित करणाऱ्या 25 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. या एप्समधून मनोरंजनाच्या नावाखाली अश्लील आणि आपत्तीजनक व्हिडीओ दाखवण्यात येत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला या ओटीटी एप्स आणि वेबसाईट्सना ब्लॉक करण्याचे आदेश केंद्राच्या वतीनं देण्यात आलेत. यात एल्ट, उल्लूसारख्या देशी प्लॅटफॉर्मचा समावेश आहे.
2024 मध्ये 18 ओटीटी प्लॅटफॉर्म केले होते बंद
अल्ट अॅप एप्रिल 2017 साली फिल्म आणि टीव्ही प्रोड्यूसर एकता कपूर हिनं लाँच केलं होतं. तर उल्लू अॅप आयआयटी कानपूरमधून पदवी घेतलेल्या विभू अग्रवालनं 2018 साली लाँच केलं होतं. यापूर्वी मार्च 2024 मध्ये सरकारनं अश्लील कन्टेन्टसाठी 18 ओटीटी प्लॅटफॉर्म बंद केले होते. यासह 19 वेबसाईट्स, 10 अॅप्स आणमि 57 सोशल मीडिया हँडल्सही बंद करण्यात आले होते.

लॉकडाऊनच्या काळात वाढते होते प्रेक्षक
2020 साली कोविडच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मना प्रोत्साहन देण्यात आलं. या काळात उल्लू आणि अल्ट सारख्या अॅप आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर अश्लील कन्टेन्ट प्रसारित होण्यास सुरुवात झाली. जुलै 2020 साली एडल्ट कॉमेडी शोसाठी सर्वाधिक स्ट्रिमिंग 1.1 कोटी एमएक्स प्लेयरला मिळालं होतं. अल्टच्या प्रेक्षकांच्यासंखअयेत 2019 च्या तुलनेत 60 टक्के वाढ नोंदंवण्यात आली होती
सरकारच्या काय आहेत गाईडलाईन्स?
1. आत्महत्या आणि आरोग्याला हानी पोहचवमारे सीन मुलांना आणि तरुणांना दाखवायचे नाहीत. अशा सीन्ससाठी हायर कॅटॅगरी किंवा इशारा देण्याची आवश्यकता
2. कोणत्याही व्यक्ती, जातीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचेल अशी भाषा, वाक्य, म्हणींचा वापर होणार नाही. देशातील भाषांची विविधता आणि संस्कृतीची जाण ठेवणे आवश्यक
3. नग्नतेबाबत देशाच्या असलेल्या कायद्यानुसारच कन्टेन्ट ब्रॉडकास्ट करण्यात येईल
4. सेक्शुअल कन्टेन्ट दाखवताना हायर क्लासिफिकेशन एडल्ट असल्याचं सुरुवातीला दाखवावं लागेल.
5. यूए 16 आणि ए कॅटेगरीतच लैंगिक कन्टेन्ट दाखवावा लागेल. मात्र हे करताना अश्लील कन्टेन्ट किती दाखवायचा याच्या नियमांचं पालन करावं लागेल.











