दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची कन्या स्वानंदी बेर्डे हिने आता अभिनय क्षेत्राबरोबरच उद्योजकतेच्या वाटेवरही पाऊल ठेवले आहे. नुकत्याच इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिने आपल्या नव्या ज्वेलरी ब्रँडची घोषणा केली असून चाहत्यांसोबत ही आनंदवार्ता शेअर केली आहे. आजच्या आधुनिक युगात महिलांमधील आणि युवतींमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. महिलांमध्ये असलेल्या कल्पकता, आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची तयारी यामुळे त्या उत्तम उद्योजक बनू शकतात.
सरकार विविध योजना, कर्जसुविधा आणि प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून महिलांना व्यवसाय उभारणीस मदत करत आहे. उद्योजकतेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळते तसेच समाजात त्यांचे स्थान अधिक बळकट होते. लहान उद्योग, स्वयंरोजगार, स्टार्टअप्स या क्षेत्रात युवतींचा सहभाग वाढत आहे. महिलांनी उद्योजकतेत पुढे आल्यास रोजगार निर्मिती होते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेतही मोठा हातभार लागतो. त्यामुळे महिलांनी आत्मविश्वासाने उद्योजकतेकडे पाऊल टाकणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत स्वानंदी बेर्डेने उचललेले पाऊल अत्यंत महत्वाचे आहेच.

स्वानंदी बेर्डेचा ‘कांताप्रिया’ ज्वेलरी ब्रँड
स्वानंदीच्या या ज्वेलरी ब्रँडचं नाव आहे. ‘कांतप्रिया’. या नावामागे एक खास भावनिक गोष्ट दडलेली आहे. वडिलांचं नाव लक्ष्मीकांत आणि आईचं नाव प्रिया यांची जोड देत तिने या ब्रँडचं नामकरण केलं आहे. “या ब्रँडच्या माध्यमातून मी आई-वडिलांच्या आठवणी जिवंत ठेवत आहे. हा फक्त बिझनेस नसून माझ्यासाठी एक भावनिक प्रवास आहे,” असं स्वानंदीने सांगितलं.मराठी चित्रपटसृष्टीशी बेर्डे कुटुंबाचं घट्ट नातं आहे. वडिलांच्या अभिनयाची जादू आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे, आई प्रिया बेर्डे यांची लोकप्रियताही आजही ताजी आहे. भाऊ अभिनय बेर्डे अभिनय क्षेत्रात करिअर करत असताना, स्वानंदीने मात्र उद्योजकतेचा मार्ग निवडला आहे. “सर्व स्वप्नं करिअरशी संबंधित नसतात; काही स्वप्नं मनातून जन्म घेतात. ‘कांतप्रिया’ त्याचं उत्तम उदाहरण आहे,” असं ती म्हणाली.
स्वानंदी बेर्डेचा महिलांसाठी नवा आदर्श
इन्स्टाग्रामवर स्वानंदीचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. तिचा फॅशनेबल आणि स्टायलिश अंदाज नेहमीच चर्चेत असतो. मात्र, आता उद्योजिका म्हणून ती नवी ओळख प्रस्थापित करत आहे. तिच्या या धाडसी पावलाचं सोशल मीडियावर मोठं कौतुक होत आहे. चाहत्यांनी तिला शुभेच्छा देत तिच्या या उपक्रमाला भरभरून साथ दिली आहे.स्वानंदी बेर्डेच्या या उपक्रमामुळे बेर्डे कुटुंबातील आणखी एक नवी ओळख प्रेक्षकांसमोर आली आहे. वडिलांच्या नावाशी निगडित असलेला हा ब्रँड तिच्यासाठीच नाही तर मराठी चाहत्यांसाठीही एक भावनिक क्षण ठरत आहे. ‘कांतप्रिया’ या नव्या ब्रँडमुळे स्वानंदीचा उद्योजकीय प्रवास किती यशस्वी ठरतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. स्वानंदी बेर्डेचे हे पाऊल अनेक महिला आणि युवतींसाठी दिशादर्शक ठरणार आहे.











