Sanjay Dutt New Restaurant : संजय दत्तने मुंबईत सुरु केले रेस्टॉरंट; पत्नी मान्यतासह दिली स्टायलिश एंट्री, Video व्हायरल

शनिवारी मुंबईत त्याने आपल्या नव्या रेस्टॉरंटचं उद्घाटन केलं. या रेस्टॉरंटचं नाव आहे “सोलेयर रेस्टॉरंट”. उद्घाटन सोहळ्यासाठी एक खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं

बॉलिवूडमधील अनेक कलाकार आता अभिनयासोबतच व्यवसायिक क्षेत्रातही आपले नशीब आजमावत आहेत. आता या यादीत ‘खलनायक’ अभिनेता संजय दत्त याच्याही नावाचा समावेश झाला आहे.  संजय दत्तने नुकतंच मुंबईत स्वतःचं रेस्टॉरंट सुरु केलं (Sanjay Dutt New Restaurant) असून, त्याचा ग्रँड लॉन्च इव्हेंट पार पडला. या कार्यक्रमात संजय दत्त पत्नी मान्यता दत्तसह स्टायलिश लुकमध्ये उपस्थित होता. दोघांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सोलेयर रेस्टॉरंट”चं भव्य उद्घाटन Sanjay Dutt New Restaurant

संजय दत्त आता अभिनेता असण्यासोबतच एक उद्योजकही झाला आहे. शनिवारी मुंबईत त्याने आपल्या नव्या रेस्टॉरंटचं उद्घाटन केलं. या रेस्टॉरंटचं नाव आहे “सोलेयर रेस्टॉरंट”. उद्घाटन सोहळ्यासाठी एक खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं (Sanjay Dutt New Restaurant). या कार्यक्रमात संजय आणि मान्यता यांनी एकत्र ग्रँड एंट्री घेतली. दोघांचाही लुक अतिशय रॉयल आणि स्टायलिश होता. त्यांनी मीडियासमोर विविध पोझ देत उपस्थितांची मनं जिंकली.

https://www.instagram.com/reel/DO1WSQrktRM/?igsh=NWRjdGlycndibGZ3

मान्यता दत्तने लुटली लाइमलाइट

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये संजय दत्त काळ्या टी-शर्टसह डिझायनर लेदर जॅकेटमध्ये दिसत आहे. तर मान्यता दत्तने शॉर्ट ड्रेस परिधान केला होता, जो तिच्या ग्लॅमरस लुकला खुलवणारा ठरला. तिने ग्लोसी मेकअप, हाय हिल्स आणि मॅचिंग पर्ससह आपला लुक पूर्ण केला होता. सोशल मीडियावर चाहत्यांकडून या जोडप्याच्या स्टायलिश अंदाजाचं भरभरून कौतुक केलं जात आहे. Sanjay Dutt New Restaurant

आगामी सिनेमांमध्ये बिझी असलेला संजय

संजयच्या सध्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर संजय दत्त नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बागी ४’ या चित्रपटात झळकला होता. या सिनेमात टायगर श्रॉफ, हरनाज कौर संधू आणि सोनम बाजवा यांच्याही भूमिका होत्या. याव्यतिरिक्त संजय दत्तच्या यावर्षी आणखी काही मोठ्या चित्रपटांची रिलीज होणार आहे. यातील एक महत्त्वाचा सिनेमा म्हणजे ‘धुरंधर’, ज्यामध्ये संजयची भिडंत बॉलिवूडचा एनर्जेटिक स्टार रणवीर सिंगसोबत होणार आहे. हा चित्रपट ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News