Aryan Khan: आर्यन खानच्या अडचणीत वाढ; समीर वानखेडे यांनी उचलले मोठं पाऊल

आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी या वेब सिरीजमध्ये दाखवलेल्या दृश्यांवर आक्षेप घेत रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि नेटफ्लिक्स यांच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

शाहरुख खानचा मुलगा आणि ‘बैड्स ऑफ बॉलीवुड’ या वेब सिरीजचा दिग्दर्शक आर्यन खान (Aryan Khan) पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडला आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी या वेब सिरीजमध्ये दाखवलेल्या दृश्यांवर आक्षेप घेत रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि नेटफ्लिक्स यांच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

काय आहे आरोप ? Aryan Khan 

समीर वानखेडे यांचा आरोप आहे की, ‘बैड्स ऑफ बॉलीवुड’ या सिरीजमध्ये त्यांची प्रतिमा मलिन करण्यात आली असून, खोटे, अपमानजनक आणि चुकीचे तथ्य दाखवण्यात आले आहेत. त्यांनी सिरीजवर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली आहे. तसेच रेड चिलीज, नेटफ्लिक्स आणि इतर संबंधित पक्षांकडून २ कोटी रुपयांची भरपाई मिळावी, ही देखील मागणी केली आहे. विशेष म्हणजे, वानखेडे यांनी ही रक्कम टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला कॅन्सरग्रस्तांसाठी दान देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सिरीज मध्ये काही अश्लील दृश्ये

समीर वानखेडे यांच्यानुसार, या सिरीजमुळे अंमली पदार्थ विरोधी यंत्रणांची आणि कायदा अंमलबजावणी संस्थांची प्रतिमा जनतेसमोर खराब झाली आहे. त्यांनी असेही सांगितले की, सिरीजमध्ये काही दृश्ये अश्लील आणि राष्ट्रचिन्ह ‘सत्यमेव जयते’चा अपमान करणारी आहेत. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांचा भंग झाला आहे. या प्रकरणात वानखेडे यांनी शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रा. लि. विरोधातही कारवाईची मागणी केली आहे. सध्या बॉम्बे हायकोर्ट आणि मुंबईतील एनडीपीएस विशेष न्यायालयात समीर वानखेडे आणि आर्यन खान यांच्याशी संबंधित खटले सुरू आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे, ‘बैड्स ऑफ बॉलीवुड’ ही वेब सिरीज यापूर्वीही वादात सापडली होती. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या सिरीजमधील एका दृश्यात रणबीर कपूर ई-सिगारेट ओढताना दिसतात, मात्र कोणतीही आरोग्यविषयक चेतावणी दाखवलेली नाही. त्यामुळे धूम्रपानविषयक नियमांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरून आयोगाने मुंबई पोलिसांना रणबीर कपूर, निर्माते आणि नेटफ्लिक्स विरोधात गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली होती.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News