भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल याची माजी पत्नी आणि प्रसिद्ध डान्सर धनश्री वर्मा (Dhanashree Verma) सध्या अश्नीर ग्रोवर यांच्या ‘राइज अँड फॉल’ या वेब शोमध्ये सहभागी झाली आहे. या शोमधून ती आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक अनकथित बाबींवर खुलेपणाने बोलताना दिसत आहे. लग्न, नात्यातील गुंतागुंत आणि अखेर घटस्फोटापर्यंतच्या प्रवासाचा तिने अनेक भागांत उघडपणे उल्लेख केला आहे. ज्यामध्ये तीने युजवेंद्र चहलशी संबंधित काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या. विशेष म्हणजे, तिने स्पष्टपणे सांगितले की लग्नाच्या फक्त दुसऱ्याच महिन्यात तिने चहलचा धोका उघडकीस आणला होता.
दुसऱ्याच महिन्यात चहलने धोका दिला? Dhanashree Verma
हा प्रसंग ‘राइज अँड फॉल’ या शोमधील एका एपिसोडमधील आहे. शोमधील एका सीनमध्ये धनश्री आणि सहकंटेस्टंट कुब्रा दोघी डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत असताना, कुब्रा धनश्रेला विचारते की तिला कधी जाणवलं की हे नातं टिकणार नाही, हे खूप कठीण होणार आहे. त्यावर धनश्री उत्तर देते, “पहिल्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात त्याला पकडलं.” कुब्रा तिच्या उत्तराने आश्चर्यचकित होत म्हणते, “क्रेझी ब्रो!” आणि त्यावर धनश्रीही हसत “क्रेझी ब्रो!” असे म्हणते. हे उत्तर ऐकून अनेक प्रेक्षक आणि चाहते अचंबित झाले आहेत. सोशल मीडियावर याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. धनश्रीने फार शांतपणे आणि संयमितपणे तिच्या वैवाहिक आयुष्यातील कठीण क्षण शेअर केले आहेत.

याआधीही शोच्या एका एपिसोडमध्ये धनश्रीने (Dhanashree Verma) एलिमनीच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली होती. तिने सांगितले की, घटस्फोटानंतर तिच्याकडून कोणतीही एलिमनी घेण्यात आलेली नाही. जे आरोप किंवा दावे सोशल मीडियावर आणि मीडियामध्ये झाले, ते पूर्णपणे चुकीचे आहेत. आदित्य नारायणसोबत संवाद साधताना तिने स्पष्ट केले होते की, तिचा आणि चहलचा घटस्फोट आपसी सहमतीने आणि शांततेत झाला असून त्याला जवळपास एक वर्ष होत आला आहे.
आता कोणत्याही नात्यात राहणार नाही –
धनश्रीने यासोबतच आणखी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. तिने सांगितले की, सध्यातरी ती पुन्हा कोणत्याही नात्यात यायला इच्छुक नाही. तिच्या म्हणण्यानुसार, “माझ्या मागच्या नात्यात मी खूप काही झेललं. त्यामुळे आता मी स्वतःसाठी जगतेय. मला माझ्या आयुष्यात आता कोणालाही नको आहे. तिने स्पष्ट सांगितले की, “मी जगभरातील महिलांसाठी एक उदाहरण बनू इच्छिते की, घटस्फोटानंतरही आयुष्य संपत नाही. उलट, आयुष्य नव्याने सुरू होऊ शकतं. धनश्रीच्या या वक्तव्याने अनेक महिलांना आत्मविश्वास मिळण्याची शक्यता आहे. तिच्या स्पष्टवक्तेपणा आणि धाडसी भूमिकेमुळे तिला समाजातून भरभरून पाठिंबा मिळतो आहे.











