छोट्या पडद्यावर आपल्या निरागस अभिनयाने कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री अविका गौर अखेर विवाहबंधनात अडकली आहे (Avika Gor Marriage). ‘बालिका वधू’ मालिकेतील ‘आनंदी’ ही भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अविका, आपल्या मंगेतर आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच मोटिवेशनल स्पीकर असलेल्या मिलिंद चांदवानीसोबत लग्नाच्या पवित्र बंधनात अडकली. आज ३० सप्टेंबर रोजी दोघांनी पारंपरिक विधींनुसार सात फेरे घेतले आणि नवीन आयुष्याची सुरुवात केली
टेलिव्हिजनवर थेट विवाह सोहळा – Avika Gor Marriage
सर्वसामान्य सेलिब्रिटी लग्नांपेक्षा अविका आणि मिलिंद यांचा विवाह एक आगळाच ठरला, कारण हा विवाह थेट राष्ट्रीय टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना पाहायला मिळाला. दोघेही सध्या एका लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘पति पत्नी और पंगा’ चा भाग आहेत. या शोमध्ये त्यांच्या लग्नाच्या सगळ्या विधी, म्हणजे मेहंदी, हळद, संगीत आणि मुख्य विवाहसोहळा अगदी पारंपरिक पद्धतीने पार पडले, तेही लाखो प्रेक्षकांच्या साक्षीने. प्रेक्षकांसाठी हे क्षण केवळ मनोरंजन नव्हते, तर एक भावनिक अनुभव होता जणू आपली लाडकी कलाकार कन्या विवाहाच्या सोहळ्यात सहभागी होते. Avika Gor Marriage

सोशल मीडियावर व्हायरल झालेला प्रेमाचा सोहळा
लग्नानंतर अविका आणि मिलिंद यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत हात जोडून सर्वांचे आभार मानले. दोघांची केमिस्ट्री इतकी जबरदस्त होती की, मिलिंदने अविकाला प्रेमाने उचलून घेतल्यावर उपस्थितांमध्ये हशा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. या खास क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाले. #AvikaMilindWedding हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये गेला आणि चाहते त्यांच्या आवडत्या कलाकाराला शुभेच्छांचा वर्षाव करू लागले.
प्रेमाची सुरुवात आणि प्रवास
अविका गौर आणि मिलिंद चांदवानी यांचं नातं काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक झालं होतं. सोशल मीडियावर त्यांचं एकमेकांसोबतचं कनेक्शन पाहूनच चाहत्यांना त्यांच्या नात्याचा अंदाज आला होता. दोघांनी एकमेकांबद्दल मोकळेपणाने बोलत त्यांचा प्रवास शेअर केला होता. एकमेकांची मूल्यं, विचार आणि सामाजिक बांधिलकी यामुळेच त्यांचं नातं अधिक घट्ट झालं. मिलिंद चांदवानी, स्वतः सामाजिक कार्यात सक्रिय आहेत, त्यांना अविकासोबत आयुष्य घालवण्याची प्रेरणा त्यांच्या समान विचारसरणीतून मिळाली. अविकानेही एक मुलाखतीत नमूद केलं होतं की मिलिंदचा शांत, समजूतदार आणि सहानुभूतीपूर्ण स्वभाव तिला खूप भावतो.
अविकाचा अभिनय ते खऱ्या आयुष्यातील नवा अध्याय
अविका गौरने केवळ ‘बालिका वधू’ मधील ‘आनंदी’ म्हणूनच नव्हे, तर ‘ससुराल सिमर का’, ‘लाडो’ आणि इतर मालिकांमधूनही आपला अभिनयकौशल्याचा ठसा उमटवला आहे. ती बालकलाकार म्हणून सुरूवात करून प्रेक्षकांसोबत वाढली. आज ती स्वतःचे निर्णय घेणारी, परिपक्व स्त्री झाली आहे. अभिनयाच्या क्षेत्रात चमक देत असतानाच, तिने आपल्या खऱ्या आयुष्यातील सर्वात खास निर्णयही अत्यंत स्पष्टतेने आणि पारदर्शकतेने घेतला.
चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
अविका आणि मिलिंद यांचं हे प्रेममय नातं, त्यांच्या सुंदर लग्नसोहळ्यासह, चाहते आणि सहकलाकार यांच्यात प्रचंड आनंदाचा विषय ठरला आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांनीही “आनंदी अखेर खऱ्या अर्थाने आनंदी झाली” अशा भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत.











