Kantara chapter 1: ‘कांतारा’ने अवघ्या 3 दिवसांत 165 कोटींचा टप्पा ओलांडला; सिनेमाची बॉक्स ऑफिसवर कमाल कमाई!

'कांतारा चॅप्टर १' ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व दाखवले आहे . सिनेमाने अवघ्या तीन दिवसांत बजेट वसूल केल्याची माहिती आहे.

“कांतारा चॅप्टर १” फक्त तीन दिवसांत त्याचे बजेट वसूल करेल. हा चित्रपट १२५ कोटी रुपयांच्या खर्चाने बनवण्यात आला होता आणि आता हा आकडा ओलांडण्यासाठी फक्त एक दिवस लागेल. त्यानंतर, चित्रपटाला भरीव नफा मिळण्याची शक्यता आहे. अशी शक्यता वर्तवली जात असतानाचा कमाईचा 165 कोटींचा आकडा शनिवार गाठला. सिनेमाने अवघ्या तीन दिवसांत बजेट वसूल केले आहे.

कांतारा चॅप्टर 1 ची तुफान कमाई

‘कांतारा चॅप्टर १’ ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व दाखवले आहे . पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ६१.८५ कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत थोडी घट झाली असली तरी, दुसऱ्या दिवसाची कमाई ४३.६५ कोटी इतकी होती, ज्यामुळे अवघ्या दोन दिवसांत चित्रपटाचा गल्ला १०५.५ कोटी पर्यंत पोहोचला. तिसऱ्या दिवशी, म्हणजेच शनिवारी, या चित्रपटाने पुन्हा एकदा मुसंडी मारत ५५ कोटी रुपयांची कमाई केली. परिणामी, भारतात या चित्रपटाची एकूण कमाई १६२.८५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तसेच, जागतिक स्तरावर (Worldwide) या चित्रपटाने २५० कोटींचा मोठा टप्पा पार केला आहे.

सऱ्याच्या मुहूर्तावर हिंदी तसेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अनेक धमाकेदार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यांपैकी या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या दोन मोठ्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे: यामध्ये  कन्नड सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा चॅप्टर १’ आणि दुसरीकडे वरुण धवन आणि जान्हवी कपूरच्या ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’चा समावेश आहे .

ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा चॅप्टर १’ समोर सर्व चित्रपट अपयशी ठरले आहेत. २ ऑक्टोबर रोजी या चित्रपटासोबत प्रदर्शित झालेले अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर आधीच मोठी कमाई करत आहेत. दुसऱ्याच दिवशी, वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या सनी संस्कारी यांच्या तुलसी कुमारीच्या कमाईत घट झाली. ऋषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा चॅप्टर १’. या आठवड्याच्या शेवटी हा चित्रपट मोठी चर्चा निर्माण करणार आहे. चाहते तो पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.

कांतारा चॅप्टर १ चे कथानक नेमके काय?

कांतारा चॅप्टर १ हा मूळ ‘कांतारा २०२२’ चित्रपटाचा प्रीक्वेल आहे, म्हणजेच या भागात मूळ कथेला आधी काय घडले होते, त्याची पार्श्वभूमी दाखवली आहे. कथा प्राचीन काळातील कर्नाटकातील तटीय भागातल्या जंगलांनी वेढलेल्या गावात घडते. गावातील लोक निसर्ग आणि देव यांच्याशी घट्ट जोडलेले असून ते पण्जूरली देव आणि गुलीग देवता या जंगल देवतांची पूजा करतात. या देवतांच्या रक्षणाखाली गावकरी शांततेत जीवन जगत असतात. मात्र, एका लोभी राजाला त्या गावातील सुपीक जमीन हवी असते. सुरुवातीला तो ती जमीन गावकऱ्यांना दान देतो, पण नंतर लोभाने पछाडलेला राजा ती परत मिळवण्याचा प्रयत्न करतो.

या विश्वासघातामुळे देवतेचा कोप ओढवतो आणि त्यातूनच देव आणि माणूस यांच्यातील पवित्र कराराची सुरुवात होते. देव जमिनीचे आणि गावकऱ्यांचे रक्षण करेल, आणि लोक त्याची भक्तीपूर्वक सेवा करतील. या कथेत एक योद्धा उदयास येतो, जो देवतेच्या आशीर्वादाने गावाच्या रक्षणासाठी लढतो. त्याच्या माध्यमातून भूत कोला या पारंपरिक नृत्य-पूजेचा उगम आणि त्यामागील आध्यात्मिक अर्थ उलगडतो. कथानकात श्रद्धा, मानवी लोभ, सत्तेचा संघर्ष आणि निसर्गाशी माणसाचं नातं यांचा सुंदर संगम दिसतो. कांतारा चॅप्टर १ हे मूळ चित्रपटात दाखवलेल्या घटनांना गूढ, पौराणिक आणि भावनिक पार्श्वभूमी देतं आणि देव-मानव संबंधाचा गूढ तत्त्वज्ञानिक अर्थ स्पष्ट करतं.


About Author

Rohit Shinde

Other Latest News