Kantara Chapter 1 Box Office Collection : कांतारा: चैप्टर 1 ची दणदणीत कमाई; 4 दिवसांत गाठला 325 कोटींचा टप्पा

चित्रपटाने पहिल्याच दिवशी 90 कोटी रुपयांची वर्ल्डवाइड कमाई केली, जी 'स्त्री 2'च्या 79.6 कोटींच्या ओपनिंग डे कमाईपेक्षा जास्त होती. दुसऱ्या दिवशी हा आकडा 150 कोटींवर पोहोचला, तर तिसऱ्या दिवशी 160 कोटींचा टप्पा पार केला. चौथ्या दिवशी, म्हणजे रविवारी, 63 कोटींची भरघोस कमाई झाली

कांतारा: चैप्टर 1 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Kantara Chapter 1 Box Office Collection)मोठा धमाका करत अवघ्या चार दिवसांत 325 कोटींची जबरदस्त कमाई केली आहे. ऋषभ शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनीत हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2025 रोजी दसऱ्याच्या दिवशी प्रदर्शित झाला होता. 2022 मध्ये आलेल्या ‘कांतारा’ या सुपरहिट चित्रपटाचा हा प्रीक्वेल आहे.

परदेशात सुद्धा बक्कळ कमाई (Kantara Chapter 1 Box Office Collection)

चित्रपटाने पहिल्याच दिवशी 90 कोटी रुपयांची वर्ल्डवाइड कमाई केली, जी ‘स्त्री 2’च्या 79.6 कोटींच्या ओपनिंग डे कमाईपेक्षा जास्त होती. दुसऱ्या दिवशी हा आकडा 150 कोटींवर पोहोचला, तर तिसऱ्या दिवशी 160 कोटींचा टप्पा पार केला. चौथ्या दिवशी, म्हणजे रविवारी, 63 कोटींची भरघोस कमाई झाली. भारतातील नेट कमाई 223 कोटींपर्यंत गेली असून एकूण जागतिक कमाईने 325 कोटींचा टप्पा गाठला आहे. परदेशांतही या चित्रपटाने सुमारे 6 मिलियन डॉलर (सुमारे 50 कोटी रुपये) कमावले आहेत.

कांतारा: चैप्टर 1 कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. याने ‘सु फ्रॉम सो’ या चित्रपटाला मागे टाकले आहे. हिंदी पट्ट्यातही चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून रविवारी हिंदी आवृत्तीत 23.5 कोटी रुपये मिळाले. तेलुगु भाषेत 11 कोटी, तमिळमध्ये 6.5 कोटी आणि मल्याळममध्ये 4.75 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. सलमान खानच्या ‘सिकंदर’ आणि राम चरणच्या ‘गेम चेंजर’ या चित्रपटांचीदेखील कमाई या चित्रपटाने मागे टाकली आहे.

काय आहे चित्रपटाची स्टोरी

कांतारा: चैप्टर 1 ही कथा सुमारे 1000 वर्षांपूर्वीच्या लोककथांवर आधारित आहे. यामध्ये निसर्ग, श्रद्धा आणि अ‍ॅक्शन यांचा सुरेख समावेश आहे. ऋषभ शेट्टी यांनी या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका स्वतः सांभाळली आहे. त्यांच्या सोबत रुक्मिणी वसंत, जयराम आणि गुलशन देवैय्या यांचे अभिनय विशेष गाजत आहेत. अजनीश लोकनाथ यांनी दिलेले पार्श्वसंगीत आणि अरविंद कश्यप यांचे छायाचित्रण प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

चित्रपट एकाच वेळी कन्नड, हिंदी, तेलुगु, तमिळ, मल्याळम, बंगाली आणि इंग्रजी या सात भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून त्यामुळे त्याला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ट्रेड विश्लेषकांच्या मते, पुढील काही दिवसांत हा चित्रपट 500 कोटींचा टप्पा सहज पार करू शकतो आणि 1000 कोटींचा आकडाही अशक्य नाही. ‘कांतारा: चैप्टर 1’ने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की दक्षिणेतील कहाण्या आणि सादरीकरण आता राष्ट्रीय स्तरावर मोठा प्रभाव टाकत आहेत.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News