महेश भट्ट (Mahesh Bhatt) हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक असून त्यांच्या सिनेमांइतक्याच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीही चर्चेत राहिल्या आहेत. नुकत्याच त्यांच्या मुलगी पूजा भट्टच्या पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या तरुणपणातील एक अजब अनुभव शेअर केला आहे, जो अनेकांसाठी धक्कादायक ठरू शकतो. या मुलाखतीत महेश भट्ट यांनी सांगितले की त्यांनी संघर्षाच्या काळात एका फिल्म फायनान्सरला मानवी मांस खाऊ घालण्याचा प्रयत्न केला होता.
कधीची घटना आहे?
ही घटना त्यांच्या वयाच्या २०व्या वर्षी घडली. त्या काळात ते चित्रपट दिग्दर्शक म्हणून स्ट्रगल करत होते. त्यांचा मित्र अरुण देसाई याने बिहारच्या गया येथील एका फायनान्सरची ओळख करून देण्याचं आश्वासन दिलं, पण त्याआधी त्यांनी वाराणसीला थांबण्याचा निर्णय घेतला. कारण अरुणच्या गुरुजींचं वास्तव्य तिथे होतं आणि त्याला त्यांना भेटायचं होतं. वाराणसीत त्यांनी (Mahesh Bhatt) एका तांत्रिकाला भेट दिली, जो रमच्या नशेत नाचत होता. महेश भट्ट यांनी सांगितलं की त्यावेळीच त्यांना काहीतरी अघोरी प्रकार सुरू असल्याची जाणीव झाली होती, पण तरीही त्यांनी काही बोलणं टाळलं.

तांत्रिकाला बोलावलं Mahesh Bhatt
दुसऱ्या दिवशी त्या तांत्रिकाने त्यांना बोलावलं आणि एका कपाटातून रॅपरमध्ये गुंडाळलेली बॉलसारखी वस्तू काढली. त्यातील एक तुकडा पॅकेटमध्ये ठेवून त्याने सांगितलं की हे मानवी मांस आहे आणि ते फायनान्सरला खायला दिल्यास तुमचं नशीब पालटेल. महेश भट्ट आणि त्यांचा मित्र ते पॅकेट घेऊन फायनान्सरकडे गेले. त्यांनी ते मानवी मांस खायच्या पानात गुंडाळून त्याला दिलं. फायनान्सरने ते पान चघळायला सुरुवात केली आणि त्यावेळी त्यांना वाटलं की आता त्यांच्या जीवनात मोठा बदल होईल.
मात्र, महेश भट्ट यांनी सांगितलं की या घटनेनंतर त्यांना त्या फायनान्सरकडून कधीच आर्थिक मदत मिळाली नाही. यश दूरच राहिलं आणि फक्त एक विचित्र, धक्का देणारी आठवण शिल्लक राहिली. त्यांनी हेही कबूल केलं की त्या काळात ते इतके असहाय्य आणि अपयशाने ग्रासलेले होते, की अशा अंधश्रद्धेच्या मार्गाकडे वळले.











