Thamma Movie Box Office Collection : Thamma ची पहिल्याच दिवशी बंपर कमाई; इतक्या कोटींचा गल्ला जमवला

थामा'ने रिलीजच्या दिवशी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तब्बल 22.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अंदाजानुसार, दिवसाअखेरीस हा आकडा 25 कोटी रुपयांचा टप्पा पार करेल.

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘थामा’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात झपाट्याने स्थान मिळवलं आहे. आयुष्मान खुराना, रश्मिका मंदाना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार ओपनिंग घेतली आहे. 21 ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या ‘थामा’कडून प्रेक्षकांना (Thamma Movie Box Office Collection) आणि निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. याचे ट्रेलर आधीच लोकप्रिय ठरले होते आणि त्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती. आता या चित्रपटाच्या पहिल्याच दिवसाच्या कमाईने निर्मात्यांच्या अपेक्षांवर मोहर उमटवली आहे.

किती कोटींची कमाई? Thamma Movie Box Office Collection

बॉक्स ऑफिस विश्लेषक सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘थामा’ने रिलीजच्या दिवशी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तब्बल 22.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अंदाजानुसार, दिवसाअखेरीस हा आकडा 25 कोटी रुपयांचा टप्पा पार करेल. विशेष म्हणजे, ही कमाई अभिनेता अहान पांडेच्या ‘सैयारा’ या चित्रपटाच्या ओपनिंगपेक्षा अधिक आहे. ‘सैयारा’ने आपल्या पहिल्या दिवशी 21 कोटी रुपयांची कमाई केली होती. थियेटरमध्ये ‘थामा’ची प्रेक्षक उपस्थिती चांगली राहिली. सकाळच्या शोमध्ये 13.92 टक्के, दुपारच्या शोमध्ये 21.22 टक्के आणि संध्याकाळच्या शोमध्ये 19.98 टक्के ऑक्युपेन्सी होती. या आकड्यांवरून स्पष्ट होते की चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. Thamma Movie Box Office Collection

काय आहे स्टोरी?

‘थामा’ हा मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी युनिव्हर्समधील पाचवा चित्रपट आहे. याआधी ‘स्त्री’, ‘भेड़िया’, आणि ‘मुंज्या’ सारखे चित्रपट या मालिकेचा भाग राहिले आहेत. मात्र ‘थामा’ची कथा त्यांच्यापेक्षा वेगळी आहे. ही एक वैम्पायरवर आधारित विनोदी प्रेमकहाणी आहे. कथानक आयुष्मान खुराना यांच्या पात्राभोवती फिरते, जो अचानक वैम्पायर बनतो आणि रश्मिका मंदाना यांच्या पात्राच्या प्रेमात पडतो. मात्र त्यांच्या प्रेमकथेच्या वाटेत अनेक विचित्र आणि धक्कादायक अडथळे येतात. नवाजुद्दीन सिद्दीकी यांची भूमिका देखील कथा रंगतदार बनवते.

निर्माते दिनेश विजन आणि दिग्दर्शक अमर कौशिक यांनी या चित्रपटाला “खूनी प्रेमकहाणी” म्हणून सादर केलं आहे. संपूर्ण कुटुंबासाठी हा एक उत्तम मनोरंजनपर चित्रपट ठरतो आहे. एका मुलाखतीत आयुष्मान खुराना म्हणाले की, “माझं पात्र ‘स्त्री’, ‘भेड़िया’ किंवा ‘मुंज्या’ सारखं नाही. हे पात्र ‘थामा’ किंवा ‘बेताल’ आहे. अगदी वेगळं. ही फिल्म मॅडॉकच्या हॉरर-कॉमेडी युनिव्हर्सला पुढे नेणारी आहे. पहिल्याच दिवशी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून असं दिसतं की ‘थामा’ दिवाळीच्या सणासुदीला सुपरहिट ठरण्याची शक्यता आहे. आता लक्ष आहे की आठवड्याच्या शेवटपर्यंत ही कमाई कुठवर पोहोचते.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News