मनसे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष. राज्याच्या राजकारणात मनसेला फार यश मिळालं नसलं तरी पक्षातील मुंबई, पुणे या भागातील जनमानसातील पोहोच मोठी आहे. राज ठाकरेंचे व्यक्तीमत्व आणि त्यांची भाषणे आजही अनेकांना भुरळ घालतात. अशा परिस्थितीत दिग्दर्शक आणि लेखक महेश मांजरेकरांनी एक मोठा खुलासा केला आहे. राज ठाकरेंवर बायोपिक करण्याचे आपले स्वप्न अधुरे राहिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले दिग्दर्शक महेश मांजरेकर?
मराठी मनोरंजनसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर सध्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. मांजरेकरांनी मुलाखतीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर बायोपिक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महेश मांजरेकर म्हणाले,”मला राज ठाकरेंची बायोपिक करायची होती. या चित्रपटाची संहितादेखील मी लिहिली होती. ‘बुद्धिबळ’ असं मी या चित्रपटाचं नाव ठेवलं होतं”.

महेश मांजरेकर पुढे म्हणाले,”एक सीन मला असा दिसतो की, राजने बाळासाहेबांना विचारलं का? त्यावर ते म्हणाले,”नाही. एक वडील काकासमोर जिंकले. ही एकच ओळ मला खूप ब्रिलियंट वाटते की काकाच्या आणि वडिलांच्या युद्धात नेहमी वडिलंच जिंकतात”. आगामी मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या मागीच चार महिन्यांत भेटीगाठी वाढल्या असून अशातच महेश मांजरेकरांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरतंय.











