मराठी चित्रपट सृष्टीतील महागुरू सचिन पिळगावकर नेहमीच त्यांच्या कोणत्या ना कोणत्या विधानामुळे चर्चेत असतात. अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. काही दिवसांपूर्वी त्यांनी राजकुमार बडजात्या यांच्याबाबत सांगताना म्हटलं होत की मृत्युपूर्वी राजकुमार यांना माझं गाणं ऐकायचं होत. आता तर सचिन पिळगावकर यांनी सतीश शाह यांच्या बाबतीत (Sachin Pilgaonkar On Satish Shah) नवा दावा केला आहे. निधनापूर्वी सतीश शाह यांनी मला शेवटचा मेसेज केला होता असा खुलासा सचिन पिळगावकर यांनी केला आहे.
काय म्हणाला सचिन ? Sachin Pilgaonkar On Satish Shah
खरं तर काल म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी वयाच्या 74व्या वर्षी सतीश शाह यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. सतीश शाह यांच्या निधनानंतर सचिन पिळगावकर हे भावूक झाले आहेत. सचिन पिळगावकर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं की सतीश शाह यांनी निधनापूर्वी मेसेज केला होता . सतीश आणि मी नेहमी बोलायचो (Sachin Pilgaonkar On Satish Shah) . एकमेकांना मेसेज करायचो. त्याचा मला आजच दुपारी 12 वाजून 56 मिनिटांनी मेसेज आला होता . त्यावेळी तो पूर्णपणे ठीक होता. पण त्याच्या निधनाची अचानक बातमी आली. या बातमीमुळे मला मोठा धक्काच बसला असे सचिन पिळगावकर म्हणाला.

सतीश शाह चित्रपट सृष्टीतील मोठं नाव
सतीश शाह हे भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन जगतातील एक प्रतिष्ठित नाव होते. त्यांनी आपल्या विनोदी अभिनयाने, उत्कृष्ट संवादफेकीने आणि सहज अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले. त्यांचा जन्म २५ जून १९५१ रोजी मुंबईत झाला. त्यांनी सेंट झेवियर कॉलेज, मुंबई येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले.











