Tejaswini Lonari Engagement : अभिनेत्री तेजस्विनी लोणारी होणार शिंदे गटाच्या नेत्याची सून; थाटात पार पडला साखरपुडा

हा साखरपुडा सदा सरवणकर यांच्या थोरल्या मुलगा समाधान सरवणकर यांच्यासोबत झाला. मुंबईतील नामांकित सेंट रेगीस या पंचतारांकित हॉटेलमध्ये अगदी जवळच्या नातेवाईकांच्या आणि काही निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी लोणारी लवकरच तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. छोट्या पडद्यावर आणि मोठ्या पडद्यावर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवणारी तेजस्विनी आता राजकारणाशी निगडित एका प्रतिष्ठित घरात सून म्हणून जाणार आहे. शिवसेना (शिंदे गट) चे नेते आणि माजी आमदार सदा सरवणकर यांच्या घरात लवकरच लग्नाची घंटा वाजणार असून तेजस्विनीचा साखरपुडा (Tejaswini Lonari Engagement) नुकताच पार पडला आहे.

कोण आहे तेजस्वीनीचा होणारा नवरा – Tejaswini Lonari Engagement

हा साखरपुडा सदा सरवणकर यांच्या थोरल्या मुलगा समाधान सरवणकर यांच्यासोबत झाला. मुंबईतील नामांकित सेंट रेगीस या पंचतारांकित हॉटेलमध्ये अगदी जवळच्या नातेवाईकांच्या आणि काही निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. तेजस्विनी आणि समाधान या दोघांनीही या प्रसंगी पारंपरिक पोशाखात हजेरी लावली होती. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून चाहत्यांकडून आणि सहकाऱ्यांकडून या नव्या जोडप्याला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

या सोहळ्याला (Tejaswini Lonari Engagement) मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक लोकप्रिय कलाकारांनी उपस्थिती लावली होती. अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री पूजा सावंत, ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील अभिजीत खांडकेकर आणि त्यांची पत्नी सुखदा खांडकेकर, तसेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे कलाकार उपस्थित होते. या सर्वांनी तेजस्विनी आणि समाधानला त्यांच्या नव्या जीवनप्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

समाधान सरवणकर हे शिवसेनेचे युवा नेते

समाधान सरवणकर हे शिवसेनेचे युवा नेते आणि माजी नगरसेवक आहेत. त्यांचे वडील सदा सरवणकर हे मुंबईतील सुप्रसिद्ध राजकारणी असून, त्यांनी अनेक वर्षे सक्रिय राजकीय भूमिका निभावली आहे. समाधान हे स्वतः सामाजिक कार्यात आणि पक्षाच्या उपक्रमांमध्ये सहभागी असतात. त्यांच्या साध्या आणि नम्र स्वभावामुळे त्यांची राजकीय वर्तुळात चांगली ओळख निर्माण झाली आहे.

तेजस्विनी लोणारीचा अभिनय प्रवास देखील तितकाच उल्लेखनीय आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात ‘छापा काटा’ या चित्रपटातून केली आणि नंतर ‘चित्तोड की राणी पद्मिनी का जोहूर’, ‘गुलदस्ता’, ‘अफलातून’, ‘दोघांत तिसरा आता सगळं विसरा’, ‘वॉण्टेड बायको नंबर वन’ आणि ‘कलावती’ यांसारख्या चित्रपटांतून आपले अभिनय कौशल्य दाखवले. छोट्या पडद्यावरही तीने आपली छाप सोडली आहे. अलीकडेच ती ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. तसेच ती बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची स्पर्धक देखील राहिली आहे.

तेजस्विनी आणि समाधान यांच्या साखरपुड्यानंतर आता सर्वांच्या उत्सुकतेचा विषय म्हणजे या दोघांचा विवाहसोहळा. दोघांचे लग्न नेमके कधी आणि कुठे पार पडणार याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी चाहत्यांमध्ये याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. मनोरंजन क्षेत्र आणि राजकारण या दोन भिन्न विश्वांचा संगम या साखरपुड्याच्या निमित्ताने घडला आहे. तेजस्विनी लोणारीच्या आयुष्यातील हा नवा टप्पा तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ठरला असून, सर्व स्तरांतून तिला आणि समाधान सरवणकरांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News