शिवपुराणात शिवलिंगाच्या पूजेचे विशेष महत्त्व सांगितले आहे. जर, शिवलिंगाची पूजा नियमित केली गेली, तर भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. काही लोक घरातही शिवलिंगाची प्रतिकृती ठेवतात. परंतु, शिवलिंग घरात ठेवण्याचे काही विशेष नियम आहेत. चला तर, याच विशेष नियमांबद्दल जाणून घेऊया…
घरात शिवलिंग ठेवण्याचे महत्त्वाचे नियम
आकार आणि दिशा
घरात अंगठ्याच्या आकाराचे किंवा त्याहून लहान शिवलिंग ठेवावे. मोठे शिवलिंग ठेवणे वास्तुशास्त्रानुसार योग्य मानले जात नाही. शिवलिंग उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवावे. या दिशा घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणण्यास मदत करतात.

नियमित पूजा
जर तुम्ही शिवलिंगाची नियमित पूजा करू शकत नसाल, तर ते घरी ठेवू नये. अयोग्य पूजेमुळे नकारात्मक परिणाम होऊ शकतो. शिवलिंगाची पूजा करताना हळद वापरू नये आणि बेलपत्र, फुले, फळे आणि मिठाई अर्पण करावी.
शिवलिंग एकटे ठेवू नये
शिवलिंगाला कधीही एकटे ठेवू नये. त्यासोबत गणपती, पार्वती, कार्तिकेय आणि नंदीच्या मूर्ती ठेवाव्यात.
एकापेक्षा जास्त शिवलिंग नसावेत
घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग नसावेत, असे शिवपुराणात म्हटले आहे.











