Vastu Tips : चोरी करुन लावलेल मनी प्लांट लावणं शुभ की अशुभ? काय सांगते वास्तूशास्त्र…

मनी प्लांट लावण्याबाबत एक सामान्य समज आहे की, तुम्ही तो दुसऱ्याच्या घरातून चोरून लावावा. पण वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांट चोरणं योग्य की अयोग्य? जाणून घेऊया.

वास्तूशास्त्रानुसार घरामध्ये मनी प्लांट लावल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. ज्या घरात मनी प्लांट असतो त्या घरात भरपूर संपत्ती येते. पण मनी प्लांटबाबत काही गैरसमज आहेत, जाणून घेऊया…

घरात मनी प्लांट लावल्यास काय होईल?

घरात मनी प्लांट लावल्यास सकारात्मक ऊर्जा, सुख-समृद्धी आणि आर्थिक भरभराट येते असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांट योग्य दिशेला लावल्यास फायदा होतो आणि चुकीच्या दिशेने लावल्यास नुकसान होऊ शकते. मनी प्लांट घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवतो. घरात मनी प्लांट ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि कुंडलीतील शुक्राची स्थिती मजबूत होते असे मानले जाते. 

मनी प्लांट चोरून लावावे का?

मनी प्लांट चोरी करून कधीही लावू नये. वास्तुशास्त्रानुसार चोरी करून मनी प्लांट लावू नये. मनी प्लांटचा संबंध पैसा आणि  लक्ष्मीशी आहे. अशा परिस्थितीत चोरी करून लावलेला मनी प्लांट लावल्यास देवी लक्ष्मीचा कोप होईल आणि घरात नकारात्मकता येईल.

पैशाने खरेदी केल्यानंतरच मनी प्लांट लावा

वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांट स्वतःच्या पैशांनी खरेदी करून लावावा, चोरी करून नाही. चोरी करून लावल्याने नकारात्मक ऊर्जा येते, तर स्वतःच्या पैशांनी खरेदी केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. जर तुम्ही विशेषतः संपत्तीसाठी मनी प्लांट लावत असाल, तर शुक्रवारी लावणे अत्यंत शुभ मानले जाते.

मनी प्लांट जमिनीवर ठेवू नये

मनी प्लांट जमिनीवर ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांटच्या वेलींनी जमिनीला स्पर्श करू नये, असे मानले जाते, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा पसरू शकते आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे, मनी प्लांटची वेली वरच्या दिशेने वाढतील अशा ठिकाणी ठेवाव्यात किंवा त्यांना आधार देऊन वाढवावे.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News