Utpanna Ekadashi : आज उत्पत्ती एकादशी; जाणून घ्या व्रताची कथा आणि महत्त्व…

उत्पत्ती एकादशी हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे व्रत आहे. जे भगवान विष्णूला समर्पित आहे. मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने मोक्ष प्राप्ती होते आणि चुकून झालेली पापे नष्ट होतात.

यावर्षी उत्पत्ती एकादशीचे व्रत शनिवारी, 15 नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणार आहे. या दिवशी व्रत करून विधीनुसार भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी पूजा करताना उत्पत्ती एकादशीची व्रत कथा अवश्य वाचावी. यामुळे व्रत पूर्ण होते आणि त्याचे महत्त्वही दिसून येते. उत्पत्ती एकादशी व्रताची कथा, आणि महत्त्व जाणून घेऊया….

उत्पत्ती एकादशी व्रताची कथा

भगवान विष्णूंना एका प्रचंड राक्षसाशी युद्ध करावे लागले. या युद्धात, विष्णूंच्या शरीरातून एक दैवी शक्ती प्रकट झाली आणि तिने त्या राक्षसाचा नाश केला. ही शक्ती म्हणजेच ‘एकादशी देवी’ होय. या घटनेमुळेच कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील या एकादशीला ‘उत्पत्ती एकादशी’ असे नाव पडले.

पौराणिक कथेनुसार, मार्गशीर्ष एकादशीच्या तारखेला देवी एकादशीचा जन्म झाला होता, तिने मुर राक्षसापासून विश्रांती घेणाऱ्या या भगवान विष्णूचे रक्षण केले. एकादशी देवीच्या हातून वध झाला. यामुळे प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी देवीला सांगितले की तुमचा जन्म एकादशीला झाला आहे, म्हणून एकादशीच्या दिवशी तुमचीही पूजा केली जाईल. या एकादशीला उत्पन्ना एकादशी म्हटले जाईल.

उत्पत्ती एकादशीचे महत्त्व

उत्पत्ती एकादशीचे महत्त्व आहे की या दिवशी व्रत केल्याने मोक्ष मिळतो, मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख, शांती तसेच समृद्धी येते. याच दिवशी ‘एकादशी’ देवीचा जन्म झाला, म्हणूनच या दिवसाला ‘उत्पत्ती एकादशी’ म्हणतात आणि हेच सर्व एकादशी व्रतांचे उगमस्थान मानले जाते. या व्रतामुळे पापांपासून मुक्ती मिळते आणि भगवान विष्णूंच्या कृपेचा वर्षाव होतो.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News