तुमच्या घरी बाळाचा जन्म जर शनिवारी झाला असेल तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी बजरंगबलीची अतिशय गोंडस नावं निवडू शकता. घरात नुकताच तान्ह्या बाळाचा जन्म झाला असेल तर तुम्ही ही नावं नक्कीच ठेवू शकता.
मारुतीचे नाव हनुमान कसे पडले?
पौराणिक कथेनुसार, श्री हनुमानांचे मूळ नाव मारुती आहे. त्यांच्या आई-वडीलांनी लहानपणी त्यांचे नाव मारुती ठेवले होते. मारुती लहानपणापासूनच खूप शक्तिशाली होते. लहानपणी झोपेतून उठल्यावर त्यांना खूप भूक लागली. त्यांना झाडाच्या आड दूरवर एक लालरस गोळा दिसला. त्यांना तो लालसर गोळा फळ आहे असं वाटलं. मात्र, ते फळ नसून साक्षात सूर्यदेव होते. आपली भूक भागवण्यासाठी मारुती सूर्याच्या दिशेने गेले आणि त्यांना सूर्यदेवांना गिळले. सूर्याला गिळल्यामुळे संपूर्ण जगात अंधार झाला.

सूर्याला गिळंकृत केल्यावर ब्रह्मांड अंधारात बुडाले, ज्यामुळे देवांपासून मानवापर्यंत सर्वजण अस्वस्थ झाले. तेव्हा सर्व देवांनी मारुतींना सूर्याला बाहेर काढण्याची विनंती केली, पण त्यांनी आपल्या हट्टीपणात कोणाचेही ऐकले नाही. शेवटी इंद्रदेवांनी आपला मारुतींच्या हनुवर म्हणजेच हनुवटीला आपल्या व्रजाने मारले, त्यामुळे हनुमानांचा हनुभंग झाला. त्यामुळे त्यांना ‘हनुमान’ हे नाव पडले.
मुलांसाठी नावे
- मारुती : पवनदेवाचा पुत्र किंवा वायूचा पुत्र.
- महावीर : अत्यंत शूर.
- रुद्राय : रुद्र म्हणजे शिव, रुद्ररूपाशी संबंधित.
- चिरंजीवी : अमर असलेला.
- अंजनेय : आई अंजनीचा पुत्र.
- बलवान : खूप मजबूत.
- शौर्य : पराक्रम आणि धैर्य
- तेजस : तेजस्वी आणि प्रभावशाल
- हनुमान : देवाचे मूळ नाव.
- बजरंग बली : ज्याचे शरीर वज्रासारखे शक्तिशाली आहे.
- केसरीनंदन : वडील केसरी यांचे पुत्र.
- पवनपुत्र : वायुदेवतेचा पुत्र.
- जटाशंकर : ज्याच्या जटांमध्ये शंकर देवाचा वास आहे.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











